Viral Video: नवरीची दबंगगिरी! फोटोग्राफरला सुनावले खडे बोल, म्हणाली नीट फोटो काढ नाही तर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 20:17 IST2022-05-10T20:15:00+5:302022-05-10T20:17:32+5:30
एका नवरीचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे. जिचा दबंग अंदाज पाहुन तुम्हाला नक्कीच तिची भीती वाटेल.

Viral Video: नवरीची दबंगगिरी! फोटोग्राफरला सुनावले खडे बोल, म्हणाली नीट फोटो काढ नाही तर...
भारतात लग्नाचा सिझन सुरु आहे. लग्नाचे अनेक मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. यात अनेक व्हिडिओ मजेशीर असतात. अनेक व्हिडिओमध्ये नवरा नवरी धमाल मस्ती करत असतात. काही डान्स आणि संगीतचे व्हिडिओ असतात. हे व्हिडिओ रंजकही असतात अन् भावुक करणारेही असतात. सध्या असाच एका नवरीचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे. जिचा दबंग अंदाज पाहुन तुम्हाला नक्कीच तिची भीती वाटेल.
या नवरीने काय दबंगगिरी केलीय ती तुम्ही व्हिडिओमध्ये पाहु शकता. व्हिडिओमध्ये नवरी फोटोग्राफरला धमकी देतेय की त्याने तिला हवा तसा आणि हवा तिथे फोटो काढला नाही तर ती त्याचे पेमेंट कट करेल.
खरंतर हा एक क्युट व्हिडिओ आहे. नवरी काही रागात नाही तर लाडातच फोटोग्राफरला धमकी देतेय. तिचा हा अंदाज तुम्हालाही आवडेल. हा व्हिडिओ bridal_lehenga_designn या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी हा व्हिडिओ लाईक, कमेंट केला आहे.