Bikini Girl चा हॉट अंदाज, बिबट्यासोबत केला बिनधास्त वॉक; बघून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 12:40 IST2023-04-24T12:38:23+5:302023-04-24T12:40:45+5:30

Bikini Girl Video : सोशल मीडियावर सध्या असाच वेगळा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कारण या व्हायरल व्हिडिओमध्ये एक हॉट आणि सेक्सी तरूणी एका पिंजऱ्यात एका बिबट्यासोबत फिरत आहे.

Bikini girl walks with cheetah in hot style watch video | Bikini Girl चा हॉट अंदाज, बिबट्यासोबत केला बिनधास्त वॉक; बघून व्हाल अवाक्...

Bikini Girl चा हॉट अंदाज, बिबट्यासोबत केला बिनधास्त वॉक; बघून व्हाल अवाक्...

Bikini Girl Video : लाखो लोक सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. सोशल मीडिया यूजरकडून शेअर करण्यात आलेले हे फोटो आणि व्हिडीओ काही तासांमध्ये व्हायरल होत असतात. बरेच यूजर यातून फेमस होतात. ते यासाठी बराच वेळ देत असून यातून त्यांची भक्कम कमाई सुद्धा होते. पण या व्हिडिओंमध्ये काहीतरी वेगळं असणं फार गरजेचं असतं. तरच ते फेमस होतात.

सोशल मीडियावर सध्या असाच वेगळा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कारण या व्हायरल व्हिडिओमध्ये एक हॉट आणि सेक्सी तरूणी एका पिंजऱ्यात एका बिबट्यासोबत फिरत आहे. तरूणीने हॉट थाय-हाय स्लिट स्कर्ट आणि बिकिनी टॉप घातली आहे. सोबतच यूजरना तिचा बिबट्यासोबत चालतानाचा कॉन्फिडन्सही खूप आवडला आहे. लोक तिच्या हिंमतीचं कौतुक करत आहेत. व्हायरल व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, व्हिडिओच्या सुरूवातीला एक तरूणी बिबट्याच्या मागे बसली आणि त्याच्यावरून हात फिरवत आहे.

त्यानंतर हॉट तरूणी त्याच्यासोबत स्टाइलने बिनधास्त चालताना दिसत आहे. बिबट्याही आरामात तिच्यासोबत पिंजऱ्यात फिरत आहे. तरूणीच्या चेहऱ्यावर जराही भीती दिसत नाहीये. तसा हा व्हिडीओ जानेवारीमध्ये शेअर करण्यात आला होता. पण सध्या तो व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर लोक भरभरून कमेंट्स करत आहेत.  सिधिका नावाच्या आर्टिस्ट इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केलाय. ज्याला 2 लाखांपेक्षा जास्त लाइक मिळाले आहेत. 

Web Title: Bikini girl walks with cheetah in hot style watch video