शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 19:38 IST

अचानक ५०० आणि १०० रुपयांच्या नोटांचा पाऊस पडू लागला. हे पाहताच लोकांनी मोठी गर्दी केली.

उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी रात्री लखनौहून बरेलीला जाणाऱ्या ट्रेनमधून अचानक ५०० आणि १०० रुपयांच्या नोटांचा पाऊस पडू लागला. हे पाहताच लोकांनी मोठी गर्दी केली. रात्र असल्याने लोकांनी त्यांच्या मोबाईल टॉर्चच्या सहाय्याने नोटा शोधल्या. काही वेळातच रेल्वे रुळांवर झुंबड उडाली, जी एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखी होती.

ट्रेनमधील एका व्यक्तीने नोटांनी भरलेली मोठी बॅग खिडकीतून हवेत फेकण्यास सुरुवात केली असं सांगितलं जात आहे. मात्र फरीदपूर स्टेशनजवळ राहणाऱ्या रहिवाशांचा दावा आहे की, अचानक आकाशातून पैशांचा पाऊस पडायला लागला. सुरुवातीला लोक गोंधळले, परंतु जवळून पाहिल्यावर त्यांना लक्षात आलं की, नोटा १०० आणि ५०० च्या आहेत. हे पाहून सर्वजण त्या नोटा घेण्यासाठी रेल्वे रुळांवर धावले.

लोकांनी अंधारात मोबाईलच्या टॉर्चचा वापर करून नोटा शोधल्या. काहींनी तर घरातून टॉर्च आणल्या. नोटा खऱ्या आहेत की खोट्या याची अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावरही जोरदार व्हायरल होत आहे. रेल्वे रुळांवर विखुरलेल्या नोटा उचलण्यासाठी लोक मोठी गर्दी करत असल्याचं स्पष्टपणे दिसून येतं. व्हायरल व्हिडिओमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. 

फरीदपूरचे निरीक्षक राधेश्याम यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना या घटनेची कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. त्यांना सतत लोकांचे फोन येत आहेत आणि ते सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. योग्य माहिती उपलब्ध होताच कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलं. परिसरात सध्या याच घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशMONEYपैसाSocial Viralसोशल व्हायरलViral Videoव्हायरल व्हिडिओ