भारीच! पठ्ठ्याने एका मिनिटात ६८ बाटल्यांची झाकणं डोक्यानं उघडली; पाहा जबरदस्त व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2020 17:37 IST2020-11-23T17:17:41+5:302020-11-23T17:37:33+5:30
Viral News in Marathi : या तरूणाचे नाव गिनिज वर्ल्ड रिकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं आहे.

भारीच! पठ्ठ्याने एका मिनिटात ६८ बाटल्यांची झाकणं डोक्यानं उघडली; पाहा जबरदस्त व्हिडीओ
आपण नेहमीच बघतो कोल्डड्रिंक्सच्या बॉटल्स उघडण्यासाठी ओपनरची आवश्यकता असते. नाहीतर लोक दातांनी बॉटल्स उघडण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही कधी विचार केलाय का? डोक्यानेही काहीजण काचेच्या कोल्ड्रीक्सच्या बाटल्या फोडतात. तुम्ही विचार करत असाल डोक्याने बॉटल्सचे झाकण कसे उघडणार.
आंध्र प्रदेशच्या एका तरूणाने हा पराक्रम केला आहे. या तरूणाचे नाव गिनिज वर्ल्ड रिकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं आहे. आंध्र प्रदेशच्या नेल्लोरमधील एका तरूणाने एका मिनिटात ६८ बॉटल्सची झाकणं उघडली आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.
DON'T TRY THIS AT HOME! 🤕
— Guinness World Records 2021 Out Now (@GWR) November 18, 2020
NEW RECORD: The most bottle caps removed with the head in one minute is 68 and was achieved by Prabhakar Reddy P, assisted by Sujith Kumar E and Rakesh B (all India) in Nellore, Andhra Pradesh, India. #GWRDaypic.twitter.com/u8CQR3cQUS
हा व्हिडीओ गिनिज वर्ल्ड रेकॉर्डने आपल्या अधिकृत पेजवर शेअर केला आहे. त्यांनी या व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे की, असा प्रकार कोणीही घरी करून पाहू नये. आंध्रप्रदेशातील नेल्लोरमधील प्रभाकर रेड्डी यांनी एका मिनिटात डोक्याने ६८ बाटल्यांची झाकणं फोडली आहेत. हा रेकॉर्ड करत असताना सुजीत कुमार आणि राकेश यांनी मदत केली. वाह, नशीब चमकलं! रुग्णालयात कुत्र्याला नोकरीवर ठेवलं; अन् आता करतोय 'हे' काम
१९ नोव्हेंबरला हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. आतापर्यंत या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. हा व्हिडीओ थरारक असून तुम्ही पाहू शकता हा तरूण एक बॉटल वेगाने फोडत आहे. बॉटल्स ठेवण्यासाठी इतर लोक मदत करत आहेत. बाबो! 'या' राजकुमारीचे बॉडीगार्डशी प्रेमसंबंध; अन् तोंड बंद ठेवायला दिले तब्बल १२ कोटी