बाबो! 'या' राजकुमारीचे बॉडीगार्डशी प्रेमसंबंध; अन् तोंड बंद ठेवायला दिले तब्बल १२ कोटी

By manali.bagul | Published: November 22, 2020 01:43 PM2020-11-22T13:43:46+5:302020-11-22T14:03:03+5:30

जॉर्डनची राजकुमारी आणि नंतर दुबईचा राजा शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम याची सहावी पत्नी हया बिन्त हुसैन हिचे तिच्या बॉडीगार्डशी (Bodyguard) प्रेमसंबंध असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण ही गोष्ट लपवून ठेवण्यासाठी या राजकुमारीने कोट्यावधी रुपये दिले आहेत.

बॉडीगार्डशी असलेले अनैतिक प्रेमसंबंध लपवण्यासाठी या राणीने तब्बल १२ कोटी रुपये दिल्याची माहिती समोर आली आहे. डेलीमेलने दिलेल्या वृत्तानुसार दुबईचा राजा शेख मोहम्मद बिन रशीद अल याने आपल्या या सहाव्या पत्नीला घटस्फोट दिला आहे. घटस्फोटानंतर मुलांचा ताबा देण्याबाबत ब्रिटनच्या न्यायालयात घटला सुरु आहे. याबाबतची सुनावणी सुरु होती.

शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांने हया ला तलाक दिला होता. राजकुमारी हया हिला काहीही न सांगता शरिया कायद्यानुसार राजाने तलाक दिला.

२०१६ ते २०१८ या कालावधीत राजकुमारी हया चे प्रेमसंबंध होते. ४६ वर्षीय राजकुमारी हया हिचे ब्रिटनच्या ३७ वर्षीय बॉडीगार्ड रसेल फ्लॉवर याच्यासोबत तब्बल दोन वर्ष संबंध होते.

ही राजकुमारी हया तिच्या बॉडीगार्डला खूप महागड्या भेटवस्तू देत असे. ज्यामध्ये १२ लाखांची घड्याळ आणि ५० लाखांची बंदुक यासारख्या महागड्या वस्तूंचा समावेश आहे. दुबईच्या राजाने राजकुमारी शरिया कायद्यांतर्गत फेब्रुवारी २०१९ मध्ये तिला घटस्फोट दिला.

त्यानंतर २०१८ मध्ये राजकुमारी हया हिने दुबई सोडली आणि लंडनला पोहोचली. मुलांचा ताबा घेतण्यासाठी राजकुमारी हयाने यूकेच्या कोर्टात खटला दाखल केला होता आणि हयाच्या बाजूने हा निकाल लागला. डेलीमेलने दिलेल्या माहितीनुसार या राजकुमारीच्या बॉडीगार्डने प्रेमसंबंधांबाबत काही सांगण्यास नकार दिला आहे. (Image Credit- Daily Mail AP-Archives)

Read in English