आणि बघता बघता त्या भल्यामोठ्या अजगरानं मांजर गिळलं, बघुन अंगावर काटा येईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 12:26 PM2021-07-29T12:26:35+5:302021-07-29T12:27:12+5:30

अजगर हा असा प्राणी आहे की त्याने विळखा घातला की मोठ्यातलं मोठं सावजही त्याच्या तावडीतून सुटु शकत नाही. अशाच एका अजगाराच्या तोंडी एका मांजराचा दारुण अंत झाला. अगदी काही क्षणात त्या भल्यामोठ्या अजगरानं मांजर अख्खं गिळलं...

And the snake swallowed the cat slowly slowly, while looking at it you will be frightened | आणि बघता बघता त्या भल्यामोठ्या अजगरानं मांजर गिळलं, बघुन अंगावर काटा येईल!

आणि बघता बघता त्या भल्यामोठ्या अजगरानं मांजर गिळलं, बघुन अंगावर काटा येईल!

Next

अजगर हा असा प्राणी आहे की त्याने विळखा घातला की मोठ्यातलं मोठं सावजही त्याच्या तावडीतून सुटु शकत नाही. अशाच एका अजगाराच्या तोंडी एका मांजराचा दारुण अंत झाला. अगदी काही क्षणात त्या भल्यामोठ्या अजगरानं मांजर अख्खं गिळलं...

कुमारआयुश या युजरनं ट्वीटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात एक मांजर अजगराच्या तावडीतून सुटण्यासाठी धडपड करतंय. त्या मांजराला अजगर काही सोडत नाहीये. हळुहळु त्या अजगरानं ते मांजर एका घासात गिळून टाकलं. आजूबाजूची लोकं हा थरार बघताना घाबरली आहेत. ती जोराजोराने ओरडतायत. लोकांच्या ओरडण्याचे आवाज तुम्हाला व्हिडिओत एकु येतील.

व्हायरल झालेला हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील पीलीभीत टायगर रिजर्व येथील आहे. अजगरानं ज्या पद्धतीनं मांजराची शिकार केली आहे, ती पाहून सगळेच हैराण झाले आहेत.हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. लोकं हा व्हिडिओ एकमेकांसोबत शेअर करण्यासोबतच यावर निरनिराळ्या कमेंटही करत आहेत. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण झाला असाल. अनेकांचं असं म्हणणं आहे, की त्यांनी पहिल्यांदाच अजगराला अशाप्रकारे मांजर खाताना पाहिलं आहे.

Web Title: And the snake swallowed the cat slowly slowly, while looking at it you will be frightened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.