शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

देवमाणूस! पुराच्या पाण्यात अडकलेल्या कुटुंबाची ट्रक ड्रायव्हरने अशी केली सूटका; VIDEO पाहा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 15:10 IST

एका कारमध्ये अडकलेल्या कुटुंबाची पुराच्या पाण्यातून सुखरूप सूटका करणाऱ्या धाडसी ट्रक ड्रायव्हरचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

Social Viral : सकाळी अंथरूणातून बाहेर आल्यानंतर ते पुन्हा रात्री झोपेपर्यंत हातात मोबाईल घेऊन इंटरनेटचा वापर करणं या गोष्टी आता कॉमन झाल्या आहेत. अगदी गावगाड्यापासून ते शहरी भागातील चांदा ते बांद्यापर्यंत सगळी माहिती मिळण्याचा सोर्स म्हणजे सोशल मीडिया होय. रिलच्या भरकटलेल्या दुनियेत काही गोष्टींच्या माध्यमातून रिअल लाईफवरही येथे प्रकाश टाकण्यात येतो. सध्या 'Sachkadwahai' या इन्स्टाग्राम पेजवर व्हायरल होणारा व्हिडिओ पाहून तुमच्या पायाखालची जमिनीच निसटेल. एका कारमध्ये अडकलेल्या कुटुंबाची पुराच्या पाण्यातून सुखरूप सूटका करणाऱ्या धाडसी ट्रक ड्रायव्हरचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या एकाच कुटुंबातील ३ जणांची त्याने कारमधून मोठ्या धैर्याने सूटका केली. वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहाच्या विरूद्ध दिशेने तो आपला ट्रक उभा करतो, ज्यामुळे कारला सपोर्ट मिळेल. सुरूवातीला तो ड्रायव्हर कारच्या बोनेटवर उभा राहून कारमधून बाहेर येणाऱ्या मुलीला सुखरूप ट्रकमध्ये बसवतो. पावसामुळे रस्त्यांना नदी-नाल्याचं स्वरूप आल्याने हे कुटुंब त्यात अडकलं असावं, असा अंदाज लावला जात आहे. रस्त्याच्या विरुद्ध दिशेला उभी असणारी माणसं हा सगळा प्रकार पाहत आहेत. पण पाण्याच्या प्रवाहाचा वेग प्रचंड असल्याने त्यांचही काही चालत नाही. 

सगळ्यात आधी एक मुलगी त्यानंतर एक महिला कारमधून बाहेर येताना दिसते. अखेरीस एक-एक करून पुरात अडकलेल्या कुटुंबातील प्रत्येकाला हा ट्रक ड्रायव्हर गाडीतून बाहेर काढतो.

व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत या ट्रक चालकाचे तोंडभरून कौतुक केलं आहे. अशी कमेंट करत काही यूजर्सनी त्याच्या धाडसी कामाची स्तुती केल्याचं पाहायला मिळतंय.तर आणखी एक जण म्हणतो, "देव तुझं भलं करो", अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाfloodपूर