बाई गं! परदेशी तरूणीने पहिल्यांदाच खाल्ली हाजमोलाची गोळी, चेहऱ्याचे हावभाव पाहून पोटधरून हसाल....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 15:41 IST2026-05-18T15:40:45+5:302026-05-18T15:41:41+5:30

Viral Video : सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झालाय. एक परदेशी तरूणी पहिल्यांदा हाजमोलाची टेस्ट घेताना दिसत आहे.  

A foreign girl ate a Hajmola for the first time her expression video goes viral | बाई गं! परदेशी तरूणीने पहिल्यांदाच खाल्ली हाजमोलाची गोळी, चेहऱ्याचे हावभाव पाहून पोटधरून हसाल....

बाई गं! परदेशी तरूणीने पहिल्यांदाच खाल्ली हाजमोलाची गोळी, चेहऱ्याचे हावभाव पाहून पोटधरून हसाल....

Viral Video : आपण पाहतो की, बरेच सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर जगभरातील वेगवेगळ्या ठिकाणां भेट देऊन तेथील वेगळेपण दाखवतात. तेथील खाद्य पदार्थ कसे असतात हेही दाखवतात. काही कंटेंट क्रिएटर जंगलात राहणाऱ्या आदिवासी लोकांना भेटून त्यांनी कधीही न पाहिलेल्या, चाखलेल्या गोष्टी खायला देतात. तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया पाहण्यासारख्या असतात. परदेशी लोकांच्या भारतात येऊन पाणीपुरी खाल्ल्यावरच्या प्रतिक्रियेचे कितीतरी व्हिडीओ बघायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झालाय. एक परदेशी तरूणी पहिल्यांदा हाजमोलाची टेस्ट घेताना दिसत आहे.  

व्हायरल झालेल्या या व्हिडिओत आपण बघू शकतो की, यूक्रेनहून आलेली एक तरूणी पहिल्यांदाच हायजोमाला खात आहे. मजेशीर भाग म्हणजे एक भारतीय तरूण तिला हाजमोला 'कँडी' असल्याचं सांगून देतो. तरूणीला सुद्धा वाटतं की, त्याने जी दिली ती एक गोड कँडी असेल. अशात ती उत्सुकतेपोटी एकाचवेळी पॅकेटमधून तीन गोळ्या काढून खाते. त्यानंतर जे होतं जे व्हिडिओत बघण्यासारखंच आहे.


हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @veggmomo नावाच्या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आलाय. ज्यात आपण बघू शकता की, तरूणी सुरूवातीला पॅकेट उघडण्यास जरा अडखळते. पण नंतर पॅकेटमधील गोळ्या काढून ती खाते. जशी ते गोळ्या तोंडात टाकते तशी त्यांची आंबट-खारट चवीने तिच्या चेहऱ्यावरचे हावभावच बदलून जातात. तरूणीचे हे हावभाव पाहून लोक लोटपोट होऊन हसत आहेत. 

व्हिडीओ व्हायरल झाल्यावर यावर लोकांच्या अनेक मजेदार कमेंट्सही येत आहेत. कुणी लिहिलं की, 'भावाने, तिला चुकीची गोष्ट मिठाई म्हणून दिली'. तर एकाने लिहिलं की, 'ही कँडी नाही पचनाचं औषध आहे'. तर दुसऱ्याने लिहिलं की, 'हे तर हाजमोलाचं इंटरनॅशनल प्रमोशन होत आहे'. तिसऱ्याने लिहिलं की, 'भलेही तिला टेस्ट आवडली नसेल, पण तिचं पोट लगेच साफ होईल'. 

Web Title : विदेशी युवती ने पहली बार हाजमोला खाया, मजेदार प्रतिक्रिया!

Web Summary : वायरल वीडियो में एक यूक्रेनी युवती पहली बार हाजमोला चख रही है। इसे मीठी कैंडी समझकर खाने पर उसकी खट्टी-नमकीन प्रतिक्रिया देखने लायक है, जिससे दर्शक हंस रहे हैं और स्वाद पर मजेदार टिप्पणियाँ कर रहे हैं।

Web Title : Foreigner Tries Hajmola for First Time, Hilarious Reactions Ensue!

Web Summary : A viral video shows a Ukrainian woman trying Hajmola, an Indian digestive candy, for the first time. Misled into thinking it's a sweet candy, her sour-salty reaction is priceless, leaving viewers amused and commenting on the unexpected flavor.