साहील काळसेकर तडिपार होणार ?

By Admin | Updated: January 10, 2015 00:15 IST2015-01-08T21:55:12+5:302015-01-10T00:15:05+5:30

कारवाई अटळ : मकेश्वर यांच्याकडून प्रांताधिकाऱ्यांनी घेतली माहिती

Will Sahayl Kalasekar retire? | साहील काळसेकर तडिपार होणार ?

साहील काळसेकर तडिपार होणार ?

चिपळूण : अट्टल गुन्हेगार साहील काळसेकर याच्याकडून गेल्या दोन दिवसात वेगवेगळे गुन्हे घडले असल्याने त्याच्या तडिपारीच्या प्रस्तावावर प्रांताधिकारी रवींद्र हजारे यांनी पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्याकडून माहिती घेतली. काळसेकर याच्यावरील तडिपारीची कारवाई अटळ झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्याने विविध प्रकारचे गुन्हे केले आहेत. यातील काही गुन्ह्यांतून याची निर्दोष मुक्तता झाली असली तरी काही गुन्ह्यात शिक्षाही झाली आहे. त्याचे मूळगाव असलेल्या नायशी गावात तो कधीही येऊ नये म्हणून ग्रामस्थांनी स्थानिक पोलिसांकडे अर्जही दिला आहे. तो आपल्या शिरळ येथील सासरवाडीत राहतो. तेथेही दहशत निर्माण केल्याने तेथील ग्रामस्थही भयभीत झाले आहेत.
पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांना समोर आणले. विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत त्याच्या तडिपारीचा प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांसमोर ठेवला होता. तेव्हापासून काळसेकर गायब होता.
त्याच्या प्रस्तावाबाबतची कार्यवाही पुढील कार्यवाही झाली नव्हती. मात्र, चार दिवसांपूर्वी शिरळचे माजी उपसरपंच दिलावर काद्री यांच्यावर चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केले असता तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तो न्यायालयातही चुकीचा वागला. त्यामुळे त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रांताधिकारी हजारे यांनी याबाबतची माहिती मकेश्वर यांच्याकडून घेतली असून, लवकरच त्याच्यावर तडिपारीची कारवाई होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)


पोलिसांसाठी कायमच आव्हान ठरलेला साहील काळसेकर मूळ गावी नायशी येथे येऊ नये म्हणून ग्रामस्थांनी स्थानिक पोलिसांकडे अर्ज दिला. शिरळ येथे तो राहात असला तरी साहीलबाबत तेथील ग्रामस्थही अद्याप भयभीत झालेले आहेत. त्यामुळे साहीलवरील कारवाईकडे लक्ष लागले आहे.


अनेक वर्षांपासून विविध प्रकारचे भयानक गुन्हे.
नायशी, शिरळ या दोन्ही गावांत साहीलच्या दहशतीने ग्रामस्थ भयभीत.
प्रांताधिकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांकडून घेतली काळसेकरबाबत माहिती.
ग्रामस्थांचे कारवाईकडे लक्ष.

Web Title: Will Sahayl Kalasekar retire?