शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचे स्त्रोत आता ‘गुगल मॅप’वर दिसणार

By admin | Updated: November 5, 2014 23:34 IST

जिल्हा परिषद : पाण्याच्या ७ हजार ७८७ स्त्रोतांचे जीपीएस नकाशे

रत्नागिरी : जिल्ह्यातील पाण्याचे स्रोत आता गुगल मॅपवर दिसणार असून, यासाठीची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. जिल्ह्यातील सुमारे ७,७८७ पाण्याच्या स्रोतांचे जीपीएस नकाशे करण्याचे काम हाती घेण्यात आल्याचे जिल्हा परिषदेच्या सुत्रांनी सांगितले.सध्या पाण्याच्या स्त्रोतांचे एकत्रीकरण नसल्याने अनेक अडचणी उभ्या राहात आहेत. अनेकवेळा जवळपास पाण्याचा कोणता स्रोत आहे, याची माहितीही मिळत नाही. पाणीटंचाईच्या काळात पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाला स्रोत माहीत नसल्यानेही दरवर्षी करोडो रुपयांचा खर्च पाणीटंचाईवर होत आहे. मात्र, आता हा खर्च काही प्रमाणात आटोक्यात येणार आहे. कारण जिल्हा परिषदेने याकामी पुढाकार घेतला आहे.पाणी व स्वच्छता मिशनमार्फत जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या ७,७८७ स्रोतांचे जीपीएसच्या माध्यमातून गुगल मॅपवर एकत्रीकरण होणार आहे. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अ‍ॅप्लीकेशन सेंटर, नागपूर या संस्थेकडून नकाशे काढण्याचे काम सुरु आहे. जिल्ह्यातही कार्यवाहीला प्रारंभ झाला असून, २० टक्के सार्वजनिक पाणीस्रोतांची तपासणी करण्याचे काम पथदर्शी प्रकल्पांतर्गत हाती घेण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २४६ पाणीस्रोतांची या मोहिमेंतर्गत तपासणी करण्यात आल्याचे जिल्हा परिषदेतील सुत्रांकडून सांगण्यात आले.पाण्याच्या स्रोेतांचे स्थान केवळ या मॅपवर दिसणार नाही तर त्या ठिकाणचे रेखांश, अक्षांश तसेच समुद्र सपाटीपासूनची उंची व खोलीची नोंद केली जाणार आहे. या स्त्रोतांवर जास्तीत जास्त लोकसंख्या अवलंबून असेल, असा स्रोत गुगल मॅपवर शोधणे लवकरच शक्य होणार आहे.स्रोतांचे निश्चितीकरण करताना त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वेगवेगळे नकाशे तयार करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील नकाशावर पाणीस्त्रोतांची नोंदणी करणे, पाणी दूषित आढळल्यास ठळकपणे निर्देशित करणे, योग्य सांकेतांक देताना येणाऱ्या अडचणींवर मात करणे त्यामुळे शक्य होणार असल्याचे सांगण्यात आले. (शहर वार्ताहर)महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अ‍ॅप्लीकेशन सेंटर, नागपूर या संस्थेकडून नकाशे काढण्याचे काम सुरू.जिल्ह्यातही कार्यवाहीला प्रारंभ. स्रोतांचे निश्चितीकरण करताना त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वेगवेगळे नकाशे तयार करण्यात येणार.