शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
4
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
5
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
6
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
9
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
10
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
11
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
13
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
14
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
15
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
16
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
17
Shyam Nath Goswami : Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
18
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
19
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
20
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

उध्दव ठाकरेंचे कोकण पर्यटन अन नवसफेड!

By admin | Updated: November 23, 2014 00:46 IST

आभाराचा दौरा : कोकण विकासाच्या भावी प्रकल्पांची उजळणीही सुरू

रत्नागिरी : शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उध्दव ठाकरे यांचा आजपासून सुरू झालेला कोकण दौरा हा खऱ्या अर्थाने पर्यटन व नवसफेड दौरा असल्याचे स्पष्ट झाले. ठाकरे यांच्या चेहऱ्यावर निवडणुकीतील विजयाचे तेज झळाळत होतेच परंतु त्यांच्या मूडही चांगला असल्याचे अनेकांना जाणवले. ज्या कोकणवासियांनी शिवसेनेला निवडणुकीत भरभरून यश दिले त्यांच्या विकासासाठी काय करता येईल, याची उजळणी करणाराच हा दौरा असल्याची चर्चाही सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच ठाकरे कोकण दौऱ्यावर आले आहेत. गणपतीपुळे येथे त्यांनी गणेशदर्शन घेतले तसेच रत्नागिरीतील विजयासाठी उदय सामंत यांनी गणपतीकडे केलेल्या नारळांच्या नवसाची फेडही ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. रत्नागिरी ते सिंधुदुर्ग अशा या दोन दिवसांच्या दौऱ्यात अनेक महत्वाच्या मंदिरांना ते भेट देणार असून त्यांच्याकडून त्या त्या मंदिरांमध्ये केलेल्या नवसांची फेड केली जाणार असल्याचे एकूण चित्र आहे. सिंंधुदुर्गातील चप्पल नवसफेडही या दौऱ्यात केला जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. आपला हा दौरा जनतेचे आभार मानण्यासाठीच आहे, राजकीय दौरा नाही, असे ठाकरे यांनी वारंवार स्पष्ट केले. मात्र निवडणुकीत युती तुटल्याने झालेली धावपळ, झालेला त्रास, दगदग व अजूनही भाजपबरोबर राज्याच्या सत्तेत सहभागाबाबतची अनिश्चितता या पार्श्वभूमीवर ‘रिलॅक्स’ होण्याचा या कोकण दौऱ्यामागे प्रयत्न असावा, हेच स्पष्ट झाले आहे. पत्रकारांच्या राजकीय प्रश्नांची उत्तरे देणे त्यांनी टाळलेच तरीही आलेल्या प्रश्नांना मोजक्या शब्दात उत्तर देत बगल दिली. रत्नागिरी दौऱ्यातील त्यांची देहबोली पाहता या दौऱ्यात त्यांना कोकण पर्यटनाचा कुटुंबियांसह आस्वाद घेताना, नवस फेडतानाच कोकणवासियांना भविष्यात प्रकल्पाच्या रुपाने काही देता येईल काय, याची अप्रत्यक्षपणे चाचपणीच ठाकरे करीत असल्याचे पक्षातील काही नेत्यांचेही मत आहे. त्यामुळे या दौऱ्यानंतरच्या ठाकरे यांच्या भूमिकेकडे कोकणवासियांचे नक्कीच लक्ष राहणार आहे. (प्रतिनिधी)