शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

विमा योजनेचे बारा प्रस्ताव मंजूर

By admin | Updated: October 21, 2015 21:28 IST

दोन फेटाळले : ११ प्रस्तावांना प्रतीक्षा

सिंधुदुर्गनगरी : शेतकरी जनता अपघात विम्याअंतर्गत या वर्षाअखेर ३७ प्रस्ताव हे विमा कंपनीकडे पाठवण्यात आले होते. त्यापैकी १२ प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून, त्यांच्या वारसांना विम्यापोटी मिळणारी प्रत्येकी एक लाख रक्कम अदा करण्यात आली आहे. विमा कंपनीकडे अकरा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत असून, दोन प्रस्ताव कंपनीने फेटाळले असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक विभागातील तंत्र अधिकारी, सांख्यिकी अरुण नातू यांनी दिली.नैसर्गिक आपत्तीमुळे काही शेतकऱ्यांचा मृत्यू होतो तर काहींना अपंगत्व येते. शेती व्यवसाय करताना घरातील कर्त्या व्यक्तीवर ओढवलेल्या अशा संकटांमुळे कुटुंबाच्या उत्पन्नाचे साधन बंद होते. अशावेळी अपघातग्रस्त शेतकऱ्यास किंवा त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करणारी शासनाची शेतकरी जनता अपघात विमा योजना आधार देणारी ठरली आहे.१ नोव्हेंबर ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत शेतकरी जनता अपघात विम्याचे प्रस्ताव विमा कंपनीकडे पाठवून त्याला मंजुरी दिली जाते. १ नोव्हेंबर २०१४ ते अद्यापपर्यंत विमा कंपनीकडे शेतकरी जनता अपघात विम्याचे ३७ प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यापैकी १२ शेतकऱ्यांच्या वारसदारांना प्रत्येकी १ लाख याप्रमाणे १२ लाखांचे धनादेश वितरीत करण्यात आले आहेत. तर कंपनीकडे ११ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. तालुक्यांमध्ये ७ प्रस्ताव प्रलंबित तर प्रस्तावांमध्ये त्रुटी असल्याचे कारण देत दोन प्रस्ताव कंपनीने फेटाळले आहेत. एखादा शेतकरी मृत झाला तर मृत झालेल्या दिवसापासून ९० दिवसांच्या आत शेतकरी जनता अपघात विम्याचा प्रस्ताव जिल्हा अधीक्षक, कृषी विभाग यांच्याकडे सादर करणे बंधनकारक आहे. क्षेत्रीय स्तरावरील कृषी पर्यवेक्षक यांनी आवश्यक ती कागदपत्रे गोळा करून विम्याचा प्रस्ताव जिल्हा कार्यालयाला पाठवणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)शेतकरी विमा : एक लाखाचा धनादेश--शेतकरी जनता अपघात विमा योजनेंतर्गत सन २०१३-१४ या वर्षामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३८ मृत शेतकऱ्यांच्या वारसांना ३८ लाख रुपये एवढे आर्थिक सहाय्य विमा कंपनीकडून प्राप्त झाले होते. या संबंधित शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले आहे. प्रस्ताव फेटाळलेशेतकरी अपघात विमाअंतर्गत दोन प्रस्ताव फेटाळण्यात आले असून, त्या प्रस्तावामध्ये त्रुटी असल्याचे कारण दाखवण्यात आले आहे.