कणकवलीत रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 03:59 PM2019-12-02T15:59:25+5:302019-12-02T16:02:09+5:30

रेल्वे तिकीट वैयक्तिक युजर आयडीवर आॅनलाईन काढून त्या तिकिटांची प्रवाशांकडून अधिक रक्कम स्वीकारून तिकिटाचा काळाबाजार केल्याच्या संशयावरून कणकवलीतील एकास अटक करण्यात आली आहे. चंद्रकांत अरविंद डेगवेकर (४१, रा. नरडवे रोड, वरचीवाडी) असे त्या संशयिताचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Trader arrested in Karnavali | कणकवलीत रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणारा अटकेत

कणकवलीत रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणारा अटकेत

Next
ठळक मुद्देकणकवलीत रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणारा अटकएक दिवसाची पोलीस कोठडी

कणकवली : रेल्वे तिकीट वैयक्तिक युजर आयडीवर आॅनलाईन काढून त्या तिकिटांची प्रवाशांकडून अधिक रक्कम स्वीकारून तिकिटाचा काळाबाजार केल्याच्या संशयावरून कणकवलीतील एकास अटक करण्यात आली आहे. चंद्रकांत अरविंद डेगवेकर (४१, रा. नरडवे रोड, वरचीवाडी) असे त्या संशयिताचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

ही कारवाई शनिवारी दुपारी तेली आळी येथील दुकानात करण्यात आली. संशयित आरोपी डेगवेकर याने आयआरसीटीसी या संकेतस्थळावर स्वत:च्या युजर आयडीवरून गेल्या दोन महिन्यांत काही तिकिटे आॅनलाईन बुकींग केली. ही तिकिटे प्रवाशांना तिकीटाच्या दरापेक्षा अधिक दराने विकली. संशयित आयडी आयआरसीटीच्या मुख्यालयाला आढळून आला.

या आधारावर हा आयडी रेल्वेच्या बेलापूर येथील सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला. याची चौकशी कोकण रेल्वेचे सिंधुदुर्ग विभागाचे पोलीस निरीक्षक अजय कुमार यांच्याकडे देण्यात आली. त्यांच्या पथकाने चौकशी दरम्यान तेलीआळीतील संशयित आरोपी डेगवेकर याची तपासणी केली. या तपासणीत संशयित आरोपीने एकाच दिवशी ६० तिकीट बुकींग केल्याचे स्पष्ट झाले.

यातील एका रद्द झालेल्या तिकीटाची रक्कमही प्रवाशांकडून घेतली. त्यामुळे याप्रकरणी अटक करून संशयित आरोपीला न्यायालयात हजर केले. या गुन्ह्याअंतर्गत १० हजारांचा दंड आणि तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. याविषयी माहिती देताना तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अरूण लोटे म्हणाले, एखादी व्यक्ती एका महिन्यात आपल्या कुटुंबातील लोकांसाठी केवळ ६ तिकिटे आॅनलाईन बुकींग करू शकते.

मात्र, रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणारे संशयित आरोपी सातत्याने आयडी बदलून प्रमाणापेक्षा अधिक तिकिटे बुकींग करतात. तसेच प्रवाशांकडून दामदुप्पट पैसे उकळतात. यावर नियंत्रण आणण्यासाठी आयआरसीटीसीतर्फे संशयास्पद आयडी तपासले जातात.

अशाप्रकारे तपासणीत संशयित आरोपी डेगवेकर याचा आयडी सापडला. त्या आधारावर चौकशी केली असता तिकिटाचा काळाबाजार झाल्याचे प्रथमदर्शनी उघड झाले आहे. अशाचप्रकारे कुडाळमध्येही कारवाई झाली आहे. उपनिरीक्षक अरुण लोटे यांच्यासह जवान भूषण कोचरेकर, विपुल म्हस्के आणि कोकण रेल्वेच्या संगणक तज्ज्ञांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Web Title: Trader arrested in Karnavali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.