शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांना भुरळ ‘असनिये’ची

By admin | Updated: August 11, 2015 22:54 IST

निसर्ग सौंदर्यांची उधळण : तब्बल चाळीस फूट उंचीवरून कोसळणारा मनोहारी धबधबा

नीलेश मोरजकर- बांदा सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या व निसर्ग सौंदर्याने नटलेल्या सावंतवाडी तालुक्यातील असनिये गावावर निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केली आहे. बारमाही पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत असलेल्या गावातील कणेवाडी येथील धबधबा पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. तब्बल चाळीस फूट उंचीवरून कोसळणाऱ्या या धबधब्याच्या आनंद लुुटण्यासाठी पर्यटक गर्दी करीत आहेत. मात्र, याठिकाणी प्राथमिक सेवा सुविधांची वानवा असून धबधबा दुर्लक्षित असल्याने येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होत आहे.असनिये गावाला ऐतिहासिक संदर्भ लाभले आहेत. बारमाही पाण्याचे स्त्रोत असलेल्या या गावात शेती बागायती मोठया प्रमाणात आहे. गावात ८३ नैसर्गिक पाण्याचे झरे आहेत. यामुळे गावात कधीही पाण्याचे दुुर्भीक्ष जाणवत नाही. गावातील ग्रामस्थांनी या नैसर्गिक पाण्यावरच आपल्या बागायती फुलविल्या आहेत. नैसर्गिक पाण्याबरोबरच दुर्मीळ वनौषधींनी गाव समृद्ध आहे. येथील जंगलात विविध प्रकारच्या दुर्र्मीळ वनौषधी आढळतात.नारळ, सुपारींच्या बागांबरोबरच येथे काजूचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. असनिये गावातील प्रस्तावित मायनिंग प्रकल्पाला स्थानिकांनी एकजुटीने प्रखरपणे विरोध दर्शविला आहे. याठिकाणी विनाशकारी मायनिंग प्रकल्प झाल्यास येथील नैसर्गिक ठेवा काळाच्या पडद्याआड जाण्याची भीती आहे. बारमाही पाणी व समृद्ध जंगल यामुळे याठिकाणी जंगली प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. गावात पट्टेरी वाघाचे दर्शन ग्रामस्थाना झाले आहे. त्याचबरोबरच बिबट्या, चितळ, सांबर, डुक्कर, गवे जंगलात पाहावयास मिळतात. गावात गर्द वनराईमुळे दुर्मीळ धनेश पक्षी वास्तव्यास असतो. या प्रजातीच्या पक्षाचे जतन करण्यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी गावात ठिकठिकाणी संवर्धन करण्यासाठी फलक लावण्यात आले आहेत.असनिये गावाला तंटामुक्त गाव, निर्मल ग्राम, पर्यावरण विकासरत्न अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. नाथपंथीय श्री संत गोसावीबाबांच्या वास्तव्याने पतीतपावन झालेले असनिये गाव हे तीर्थक्षेत्रीय भूमी म्हणूनही प्रसिद्ध आहे. असनिये गावाच्या शिमगोत्सवाप्रसंगी प्राचिन इकाच्या वाटीतील तीर्थासाठी हजारोंच्या संख्येने भाविक दरवर्षी गावात गर्दी करतात. गावात परंपरेने असलेल्या बारमाही दारुबंदीचे वृत्त अंगिकारत येथील तीर्थाचे पावित्र्य आजची पिढीही तेवढ्याच गांभीर्याने जपत आहे.असनिये-घारपी मार्गावरील कणेवाडी येथील धबधबा पर्यटकांना भुरळ घालत आहे. असनिये-घारपी मार्गावरुन या धबधब्याचे विहंगम दर्शन होते. डोंगरातून वाहणारा हा धबधबा असनिये गावाच्या सौंदर्यात अधिकच भर टाकतो. या धबधब्याकडे जाण्यासाठी पक्की वाट नसून जंगलातून मार्ग काढत या धबधब्याकडे जावे लागते. धबधब्याच्या पायथ्याशी पोहोचल्यावर या धबधब्याची भव्यता लक्षात येते. तब्बल ४0 फूट उंचावरून दगडातून वाहणाऱ्या या धबधब्यामुळे पर्यटकही आकर्षित होतात. सुटीच्या दिवशी स्थानिकांसह परिसरातील पर्यटक या धबधब्याच्या ठिकाणी वर्षा पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी गर्दी करतात. मात्र, याठिकाणी प्राथमिक सुविधाही नसल्याने पर्यटक नाराजी व्यक्त करतात.धबधब्याचा पर्यटनातून विकास व्हावाअसनिये गावातील कणेवाडी धबधबा पर्यटकांना आकर्षिक करत असून हा धबधबा पर्यटकांना पर्वणी ठरू शकतो. सातत्याने कोसळणाऱ्या दरडींमुळे आंबोली घाट पर्यटकांसाठी असुरक्षित ठरत असून, पर्यटकांना असनिये येथील धबधबा पर्याय ठरू शकतो. यासाठी शासनाने पश्चिम घाटातील दुर्लक्षित नैसर्गिक स्थळांचा विकास करणे गरजेचे आहे. बांदा शहरापासून १६ किलोमीटर अंतरावर हा धबधबा असल्याने गोवा तसेच परिसरातील पर्यटकांना याठिकाणी येणे सोयीचे होणार आहे.या धबधब्याचा पर्यटन दृष्टिकोनातून विकास करावा यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पर्यटन विभागाकडे दोन वर्षांपूर्वी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. याबाबत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात येत आहे. असनिये-घारपी रस्त्यावरुन धबधब्याकडे जाण्यासाठी १00 मीटर अंतर असून ही पायवाट पक्की करावी, धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी लोखंडी रॅम्प उभारावेत, पर्यटकांना माहिती होण्यासाठी दिशादर्शक तसेच माहिती फलक उभारावेत, अशी मागणी प्रस्तावात करण्यात आली आहे.- गजानन सावंत,सरपंच, असनिये