सिंधुदुर्गनगरी : इंडियन व्हसल अॅक्टनुसार आता खाडीपात्रातील वाळू काढण्यासाठी होड्यांना मेरीटाईम बोर्डाची परवानगी घ्यावी लागणार आहे. तर चोरट्या वाळूला चाप बसण्यासाठी वाळूच्या प्रत्येक परवान्यावर आपली सही असणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिली.तब्बल दोन वर्षानंतर वाळू उत्खननावरील बंदी उठल्यानंतर परवाने देऊन अधिकृतरित्या वाळूला सुरुवात झाली. असे असले तरी वाळू उत्खननावरील अरिष्ट अद्याप दूर झालेले नाही. कारण खाडीपात्रासाठी वाळू काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या होड्यांना मेरीटाईम बोर्डाची परवानगी घेणे आवश्यक बनले आहे. त्यामुळे सध्या वाळू उत्खनन थांबले आहे. हा प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांना एक दिवस बोलावून वाळू वाहतुकीचे परवाने देण्याची कार्यवाही केली जाणार आहे. त्यासाठी वाळू व्यावसायिकांनी किंवा होडी मालकांनी आवश्यक ती कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. त्यांना एक वर्षासाठी परवाने देण्यात येणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिली. वाळू व्यावसायिकांना सूचनाकुडाळ : वाळूपट्ट्याचे लिलाव घेतलेल्या कुडाळ व मालवणातील अधिकृत वाळू व्यावसायिकांना नोटिसा काढून वाळू उत्खनन व वाहुतकीबाबत सूचना महसूल प्रशासनाने केल्या आहेत.वाळू लिलावधारकांच्या पट्ट्याला शनिवारी अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर व निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी भेट देऊन पाहणी केली होती. यावेळी वाळू पट्ट्यातील काही होड्यांवर रजिस्ट्रेशन क्रमांक नव्हते. तर काही रॅम्पवर जादा डंपर उभे ठेवण्यात आले होते. अशा प्रकारच्या काही गोष्टी आढळल्याने मालवण व कुडाळातील लिलाव घेतलेल्या वाळू व्यावसायिकांना महसूल विभागाने नोटिसा बजावल्या असून, होड्यांचे रजिस्ट्रेशन करा, होड्यांवर नावे घाला, रेती गट आहेत, त्याठिकाणी बांबू लावावेत, दिलेल्या प्रमाणापेक्षा जास्त वाळू भरू नका, अशा सूचनाही या नोटिसात दिल्याची माहिती महसूल विभागाने दिली आहे. नियमबाह्य वाळू उत्खनन व वाहतूक आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असेही संबंधितांना सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)सहीने निघणार पासजिल्ह्यात अद्यापही चोरटी वाळू केल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या बेकायदेशीर व चोरट्या वाळू वाहतुकीवर कठोर कारवाईचे पाऊल उचलले आहे. यापूर्वी खनिकर्म विभागाकडून खनिकर्म अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे वाळूचे पास दिले जात होते. मात्र आता आपण स्वत: पासवर सही करण्यास सुरुवात केल्याचे जिल्हाधिकारी भंडारी यांनी सांगितले.पोलीस अहवालानंतर तलाठ्याचे निलंबनवाळू व्यावसायिकांकडून लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने पकडलेला मालवण तालुक्यातील माळगावचा तलाठी दिलीप ठाकूर याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. पोलिसांकडून अहवाल प्राप्त होताच निलंबनाची कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिली. १२ हजार पासेसवर केली सहीअद्यापपर्यंत १२ हजार वाळू पासेसवर सही करण्यात आली आहे. तसेच एका पासवर अनेकवेळा वाळूची वाहतूक करण्यासाठी कारवाई करण्याच्या दृष्टीने वाळू भरून डंपर बाहेर पडल्यावर पासावर शिक्का मारला जाणार आहे, अशी माहितीही यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिली.
मेरीटाईमची परवानगी लागणार
By admin | Updated: August 26, 2015 22:54 IST
अनिल भंडारींची माहिती : खाडीपात्रातील वाळू उत्खननावर निर्बंध
मेरीटाईमची परवानगी लागणार
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}