शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

विकासावर बोलण्याची हिंमत नाही

By admin | Updated: October 7, 2014 23:40 IST

नारायण राणे : माणगाव येथील प्रचारसभेत विरोधकांवर टीका

माणगाव : माणगाव खोऱ्याचा संपूर्णत: कायापालट व विकासात्मक परिवर्तन होणे गरजेचे आहे. मात्र, जिल्ह्यातील विरोधक केवळ काँग्रेसवर व माझ्यावर टीका करण्याचेच काम करतात. विकासाच्या बाबतीत बोलण्याची कोणाचीही हिंमत होत नाही. कारण विकासासाठी यांचा कधीही हातभार नसतो, असे प्रतिपादन काँग्र्रेसचे कुडाळ-मालवण मतदारसंघातील उमेदवार आणि माजी उद्योगमंत्री नारायण राणे यांनी माणगाव येथे केले. माणगाव येथील राधाकृष्ण हॉलमध्ये झालेल्या सभेत राणे बोलत होते. यावेळी नारायण राणे यांनी माणगाव खोऱ्यातील साळगाव तसेच अन्य ठिकाणी कॉर्नर सभा व विविध गावांना भेटी देऊन गावातील मतदारांच्या भेटी घेतल्या. जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, माजी जिल्हा परिषद सदस्य आबा मुंज, सुनील भोगटे, प्रकाश मोर्ये, मधुकर भावे, अ‍ॅड. संग्राम देसाई, अ‍ॅड. किशोर शिरोडकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, पांडुरंग कोंडसकर, सरपंच सुनिता सावंत, प्रभाकर परब, विशाल परब, मोहन सावंत, अनिल कुडपकर, काका केसरकर, बच्चू नाईक, सचिन परब, श्रावण धुरी, बाळू भिसे, महेश भिसे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राणे म्हणाले, गेल्या २५ वर्षात तुमच्यामुळे मला अनेक पदे मिळाली. या पदांचा वापर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी करण्याचा प्रयत्न राहिला. भाजपवाल्यांनी लोकसभा निवडणुकीवेळी दिलेली आश्वासने पाळली नाहीत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकासात शिवसेनेचे योगदान काय? असा सवाल करत शिवसेनेच्या उध्दव ठाकरे यांना इथे या म्हणावं. इथे पूर, वादळं येतात. पण ते कधी येतात का? असा प्रश्न केला. मराठी माणसाची परिस्थिती बदलली नाही, पण ठाकरे यांची सुधारली, अशी टीका त्यांनी केली. (प्रतिनिधी)