शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांची टीईटी परीक्षेकडे पाठ

By admin | Updated: November 2, 2014 00:43 IST

गतवर्षीपेक्षा ५0 टक्केच अर्ज प्राप्त : सन २0१३ नंतरच्या शिक्षकांना अनिवार्य

सिंधुदुर्गनगरी : गतवर्षीपासून राज्य शासनाने राज्यभरातील सर्व भावी तसेच १३ फेब्रुवारी २०१३ नंतर सेवेत रुजू झालेल्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या कार्यरत शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (टी.ई.टी.) अनिवार्य केली आहे. जिल्हाभरातून एकूण २ हजार २५८ अर्ज प्राप्त झाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत केवळ सुमारे ५० टक्केच अर्ज प्राप्त झाले असून यंदा भावी शिक्षकांनी टीईटी परीक्षेकडे पाठ फिरविली असल्याचे दिसून येते.गतवर्षी १५ डिसेंबर २०१३ रोजी सिंधुदुर्गसह राज्यभरात शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर तब्बल तीन महिन्यांच्या कालावधीने या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला होता. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या जिल्ह्यातील पात्र भावी शिक्षकांची संख्या फारच कमी होती. त्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर पसरला होता. गतवर्षीप्रमाणे यंदाही शिक्षक पात्रता परीक्षेसाठी प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविण्यात आली होती. गतवर्षी झालेल्या टीईटी परीक्षेचा निकाल जाहीर होऊन सात महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र गतवर्षीच्या शिक्षक पात्रता परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पात्र उमेदवारांना नोकरी देण्यात आलेली नाही. त्यामुळे पात्र ठरलेल्या भावी शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे. शासनाने शिक्षक पदाची भरती न करता पुन्हा यंदाही शिक्षक पात्रता परीक्षेचा बिगुल फुंकला आहे.यंदा गतवर्षीप्रमाणे टीईटी परीक्षेत खुल्या उमेदवारांना ५० गुणांची तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४५ गुणांची अट करण्यात आली आहे. शिक्षणाच्या अधिकार अधिनियमानुसार इयत्ता पहिली ते पाचवी तसेच इयत्ता सहावी ते आठवीला अध्यापन करणाऱ्या शिक्षण सेवक उमेदवाराला शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे. ही शिक्षक पात्रता परीक्षा यावर्षी १४ डिसेंबर २०१४ रोजी घेण्यात येणार आहे. गतवर्षी टीईटी परीक्षेसाठी केवळ जिल्हास्तरावरच आॅनलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा होती. मात्र, यावर्षी प्रथमच या परीक्षेचे अर्ज स्वीकारण्यासाठी जिल्ह्यात आठही तालुकास्तरावर पंचायत समितीच्या शिक्षण विभागात स्वतंत्र कक्षाची निर्मिती करण्यात आली होती. या परीक्षेसाठी २७ सप्टेंबरपासून ३० आॅक्टोबरपर्यंत आॅनलाईन अर्ज स्वीकारण्यात आले. जिल्हाभरातून या टीईटी परीक्षेसाठी २ हजार २५८ अर्ज प्राप्त झाले आहेत. गतवर्षी केवळ १६५ डी. एड्., बी. एड्. धारक उत्तीर्णगतवर्षी पार पडलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी डी. एड्., बी. एड्. धारकांपैकी ४३७५ टीईटीसाठी अर्ज केले होते. त्यापैकी प्रत्यक्षात ३ हजार ९७८ अर्जदारांनी परीक्षा दिली होती. टीईटी परीक्षा त्यावर्षी कठीण गेल्याने केवळ १६५ डी. एड्., बी. एड्. धारक पास झाले होते. त्यामुळे यावर्षी संबंधितांनी या परीक्षेकडे कमालीची पाठ फिरविलेली दिसून येत आहे.१६५ टीईटीधारक नोकरीच्या प्रतीक्षेतगतवर्षी टीईटी परीक्षा पास झालेल्या जिल्ह्यातील १६५ भावी शिक्षकांना अद्यापही शासनाकडून नोकरी मिळाली नसल्याने त्यांच्यात नाराजीचा सूर उमटत आहे. टीईटी पास झालेले प्रमाणपत्र हे ७ वर्षे ग्राह्य धरले जाणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर नोकरीत सामावून घ्यावे अशी मागणी या पास झालेल्या टीईटीधारकांनी केली आहे.गतवर्षी सव्वा दोन लाख खर्चटीईटी परीक्षेच्या नियोजनासाठी शासनाकडून गतवर्षी २ लाख २१ हजार ७० रुपये एवढा निधी खर्च करण्यात आला होता. यावर्षीही शासनाकडून योग्य ते नियोजन करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)