पोलीस अधीक्षकांचा फोंडाघाटमध्ये लॉंग मार्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 05:37 PM2021-05-13T17:37:22+5:302021-05-13T17:39:52+5:30

CoronaVirus Sindhudurg : जिल्ह्याच्या कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांचा ताफा फोंडाघाटमध्ये बुधवारी पोहोचला. त्यांनी एसटी स्टँडपासून पोलीस दूरक्षेत्र, शासकीय विश्रामगृह, तपासणी नाक्यापर्यंत पायी चालत बाजारपेठ बंद असल्याची पाहणी केली.

Superintendent of Police's long march in Fondaghat | पोलीस अधीक्षकांचा फोंडाघाटमध्ये लॉंग मार्च

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या उपस्थितीत फोंडाघाट बाजारपेठेमध्ये लाँग मार्च काढण्यात आला.

Next
ठळक मुद्देपोलीस अधीक्षकांचा फोंडाघाटमध्ये लॉंग मार्चआदर, भीतीचा मिलाफ : कमांडोंचाही सहभाग

फोंडाघाट : जिल्ह्याच्या कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांचा ताफा फोंडाघाटमध्ये बुधवारी पोहोचला. त्यांनी एसटी स्टँडपासून पोलीस दूरक्षेत्र, शासकीय विश्रामगृह, तपासणी नाक्यापर्यंत पायी चालत बाजारपेठ बंद असल्याची पाहणी केली.

पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला, फोंडाघाट पोलीस कॉन्स्टेबल मुल्ला आणि विशेष पोलीस कमांडो यांचे पथक त्यांच्यासोबत होते. यावेळी त्यांनी विनाकारण फिरणाऱ्यांवर आणि बंद काळात छुपा, अवैध व्यवसाय करून प्रशासकीय सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचे आदेश दिले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थापन झालेल्या स्थानिक दक्षता समितीच्या सहकार्याबाबतची बाब यावेळी ग्रामस्थांनी त्यांच्या निदर्शनास आणून देताना केवळ स्थानिक पोलीस पेठेतील व्यापाऱ्यांवर कारवाई करताना आणि समजावताना दिसतात, असे सांगितले. यावेळी त्यांनी स्थानिक दक्षता कमिटीलाही बरोबर घेण्याच्या सूचना केल्या.

 

Web Title: Superintendent of Police's long march in Fondaghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.