शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘इतवार कि शाम रॉक स्टार के नाम’

By admin | Updated: February 23, 2016 00:04 IST

युवाई थिरकली : काँग्रेसच्या सुंदरवाडी महोत्सवाची सांगता

सावंतवाडी : काँग्रेस आयोजित सुंदरवाडी महोत्सवाला खरी भुरळ घातली ती रॉक स्टारनी. युवाई तर रॉक स्टारच्या गाण्यावर बेधुंद झाली होती. त्यामुळे ‘इतवार की शाम रॉक स्टार के नाम’ असेच म्हणावे लागेल. हजारो रसिकांच्या उपस्थितीत येथील जिमखाना मैदानावर हा म्युझिकल शो पार पडला. काँग्रेसच्यावतीने गेले तीन दिवस सुंदरवाडी महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवाचा समारोप रविवारी पडला. यावेळी रॉक स्टार म्युझिकल डायरेक्टर सचिन गुप्ता म्युझिकल नाईटचे आयोजन केले होते. यामध्ये रितु रंजन मोहंती, दर्शन रावल, अक्सा सिंग आदींनी आपल्या सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली. कार्यक्रमाची सुरूवात रितु रंजन मोहंती यांच्या गाण्याने झाली. त्यांनी एकापेक्षा एक अशी अनेक गाणी सादर केली. ‘दुरी’मधील गाण्याने रसिकांना भुरळ घातली. तर दर्शन रावल याने रॉकचा नमुना सुंदरवाडी महोत्सवात दाखवून दिला. मेरा फेटो निखलुगा... या गाण्यावर तर दर्शन रावल यांच्या सोबत युवाईची पावले थिरकली. सचिन गुप्ता व आक्सा सिंग यांनी बॉलिवूडमधील गाणी सादर केली. अनेक गाणी ही नव्या चित्रपटातील होती. त्यामुळे युवाईने चांगलीच दाद दिली. रसिकही गाण्यावर जल्लोष करताना दिसत होते. अनेक वेळा सुरक्षा रक्षकांना रसिकांना आवरणे कठीण झाले. दर्शन रावल यांनी रसिकांत येऊन आपली गाणी सादर केल्याने रसिकांतून आणखी उत्साह संचारला. अनेक वेळा प्रेक्षकांमधून गाण्याची फर्माईशही करण्यात येत होती. तब्बल अडीच तास चाललेल्या ‘रॉक स्टार अ‍ॅण्ड म्युझिकल नाईट’ला रसिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे रॉक स्टारही चांगलेच भारावून गेले होते. (प्रतिनिधी) रसिकांच्या आग्रहाने रॉक स्टार पुन्हा स्टेजवर रसिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे तसेच युवाई गाण्यावर चांगलीच थिरकल्याने हा कार्यक्रम संपूच नये, असे रसिकांना वाटत होते. तरीही रितु रंजन मोहती यांच्यासह दर्शन रावल यांनी शेवटचे गाणे म्हणून काढता पाय घेतला. मात्र, बराच वेळ स्टेजवर कोण न आल्याने रसिकांनी ‘वन्स मोर’चा नारा लावला. हा नारा बराच वेळ सुरू होता. अखेर कलाकार पुन्हा स्टेजवर आल्यानंतर रसिक शांत झाले.