शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी गावाचेही नाव उज्ज्वल करावे

By admin | Updated: February 26, 2015 00:14 IST

संदेश सावंत : ओसरगाव येथे वर्गखोल्यांचे बांधकाम सुरू

कणकवली : विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे प्राथमिक शिक्षण मिळाले तर भावी पिढी शैक्षणिकदृष्ट्या सक्षम होणार आहे. यासाठीच ओसरगाव येथील पूर्ण प्राथमिक शाळेच्या नूतनीकरणासाठी तसेच वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी १८ लाखांचा निधी देण्यात आला आहे. या शाळेच्या माध्यमातून येथील विद्यार्थ्यांनी दर्जेदार शिक्षण घेऊन शाळेबरोबरच आपल्या गावाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संदेश सावंत यांनी केले.ओसरगाव पूर्ण प्राथमिक शाळा नं. १ येथे बुधवारी वर्गखोल्यांचे भूमिपूजन मंगळवारी झाले. यावेळी ते बोलत होते. पंचायत समिती सभापती आस्था सर्पे, गटशिक्षणाधिकारी अनिल कांबळे, केंद्रप्रमुख श्रीमती कवठकर, सरपंच वनिता चौकेकर, उपसरपंच गुरूदास सावंत, दिनेश अपराध, शालेय समिती अध्यक्षा पल्लवी राणे, उपाध्यक्ष दिनेश चव्हाण, पोलीसपाटील कृष्णा तांबे, ग्रामसेवक कांबळे, प्रकाश कदम, माजी सरपंच अर्जुन देसाई, प्रदीप कदम, मुख्याध्यापक गोसावी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. गोसावी यांनी स्वागत केले. आभार पल्लवी राणे यांनी मानले. (वार्ताहर)१८ लाखांच्या निधीची तरतूदसंदेश सावंत म्हणाले, ओसरगाव येथील या प्राथमिक शाळेबाबत काही कारणांमुळे वाद निर्माण झाला होता. येथील ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष असताना मी या शाळेला भेट दिली. शाळेची पाहणी केल्यानंतर नवीन वर्गखोल्या बांधण्याची येथे आवश्यकता असल्याचे लक्षात आले. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी १८ लाखांच्या निधीची तरतूद आम्ही केली आहे. त्यापैकी शाळेच्या जुन्या इमारतीच्या नूतनीकरणासाठी ८ लाख रूपये, तर नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी १० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील निधी शाळेकडे वर्ग करण्यात आला आहे. या शाळेच्या माध्यमातून उपलब्ध सुविधांचा लाभ विद्यार्थ्यांनी करून घेऊन आपले भविष्य उज्ज्वल बनवावे.