शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढल्याचे समाधान

By admin | Updated: December 26, 2014 23:52 IST

विनोद गोसावी : कुडाळात गोसावी समाजबांधवांचा मेळावा

चौके : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहून प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करून ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या गोसावी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांची होणारी वाढ समाधानकारक आणि कौतुकास्पद आहे. त्यामुळे समाज मंडळापुढील आव्हाने वाढली आहेत. भविष्यात विद्यार्थ्यांच्या गुणगौरवाच्या पुढेही नवीन काही करावं लागेल, असे प्रतिपादन नाथसमाज ऐक्यवर्धक मंडळ मुंबईचे अध्यक्ष विनोद गोसावी यांनी केले. सिंधुदुर्ग नाथपंथी गोसावी समाज ऐक्यवर्धन मंडळाचा जिल्हास्तरीय समाजबांधव मेळावा कुडाळ नाथबांधवांच्या उपस्थितीत झाला. या मेळाव्याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून गोसावी बोलत होते.यावेळी नाथपंथी गोसावी समाज ऐक्यवर्धक मंडळ सिंधुदुर्गच्या अध्यक्षा उर्मिला गोसावी, उपाध्यक्ष शरद गोसावी, मुंबई मंडळाचे सचिव अमरदीप गोसावी, योगेश गोसावी, भालचंद्र गोसावी आदी उपस्थित होते. विनोद गोसावी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मेळाव्याची सुरुवात करण्यात आली. गोसावी म्हणाले, आपल्या समाजासाठी आपण काहीतरी केले पाहिजे ही जाणीव सत्कार झालेल्या गुणवंतांना झाली पाहिजे. संघटित समाज शेवटपर्यंत आपल्या नाथ बांधवांसाठी झगडणारा असला पाहिजे. आपल्या सर्वांना मिळून समस्यामुक्त समाज बनवायचा आहे. त्यासाठी आपापसात समन्वय साधून नाथ बांधवांसाठी आरोग्य शिबिर, व्यवसाय मार्गदर्शन, वधु-वर मेळावा यांसारखे उपक्रम हाती घेतले पाहिजेत. मुंबई मंडळ समाजाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी बांधील आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपल्या स्वत:च्या समाजमंदिराचा संकल्प असून त्यासाठी जिल्ह्यातील नाथबांधवांनी जागा उपलब्ध करून द्यावी. मुंबई मंडळ इमारत निधी जमा करील, असे ते म्हणाले. मंडळाचे उपाध्यक्ष शरद गोसावी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. विनोद गोसावी व उर्मिला गोसावी यांच्या हस्ते नाथसमाजातील चाफेखोल येथील आरोग्य पर्यवेक्षक जनार्दन गोसावी, म्हापण येथील संगीत विशारद गिरीश गोसावी, राज्यस्तरीय क्रीडापटू जीवन गोसावी, विठ्ठल गोसावी, रमाकांत गोसावी, अमरनाथ गोसावी, विठ्ठल गोसावी, कृष्णा गोसावी यांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.सन २०१३-१४ मध्ये इयत्ता दहावी व बारावीमध्ये ६० टक्केपेक्षा अधिक गुण मिळविलेल्या तसेच पदवी, पदविका उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन झिलू गोसावी व प्रास्ताविक भालचंद्र गोसावी यांनी केले. शरद गोसावी यांनी आभार मानले. (वार्ताहर)