मुलानेच केला आईचा खून, बंदुकीतून झाडली गोळी, भयानक घटनेनं कोकण हादरलं, धक्कादायक कारण समोर आलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 11:55 IST2026-01-15T11:35:14+5:302026-01-15T11:55:48+5:30
Sindhudurg Crime News: पोटच्या मुलानेच जन्मदात्या आईचा बंदुकीतून गोळी झाडून खून केल्याची धक्कादायक घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात असलेल्या अणसूर गावात घडली आहे.

मुलानेच केला आईचा खून, बंदुकीतून झाडली गोळी, भयानक घटनेनं कोकण हादरलं, धक्कादायक कारण समोर आलं
पोटच्या मुलानेच जन्मदात्या आईचा बंदुकीतून गोळी झाडून खून केल्याची धक्कादायक घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात असलेल्या अणसूर गावात घडली आहे. ही घटना बुधवारी रात्री घडली. वासंती वासुदेव सरमळकर (६५) असं मुलाने केलेल्या गोळीबारात मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, आरोपीला अटक करण्याची कारवाई सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार मृत वासंती वासुदेव सरमळकर आणि आरोपी असलेला मुलगा उमेश वासुदेव सरमळकर यांच्यात सातत्याने कौटुंबिक वाद आणि भांडणे होत होती. आरोपी उमेश हा कर्जबाजारी झालेला होता. त्याने विविध बँका आणि बचत गटांकडून कर्जे घेतली होती. त्यावरून मायलेकांमध्ये वाद व्हायचे.
दरम्यान, काल रात्री वासंती सरमळकर ह्या घरासमोरील अंगणात बसल्या असताना आरोपी मुलगा उमेश सरमळकर याने घराच्या छतावर चढून तिच्यावर बंदुकीतून गोळीबार केला. ही गोळी वासंती यांच्या थेट छातीत घुसल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. तसेच त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी जागृती जयेश सरमळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वेंगुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच पोलिसांना आरोपीला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच अधिक तपास पोलीस करत आहेत.