शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळांमध्ये पुन्हा मुलांचा किलबिलाट सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 15:21 IST

नवी कोरी पुस्तकं, वह्या... नव्या मित्र-मैत्रिणी... नवीन वर्गात बसण्याची उत्सुकता... नवा युनिफार्म... काहींसाठी तर नवी शाळा... मनात थोडीशी भीतीही... शाळेचे नाव काढताच रडवेले झालेले चेहरे... रडणाऱ्या मुलांना वर्गात बसविण्यासाठी शिक्षकांची धावपळ... विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांनी केलेली जय्यत तयारी... अशा वातावरणात आणि मुलांच्या किलबिलाटात कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा सोमवारी पुन्हा एकदा बोलक्‍या झाल्या.

ठळक मुद्दे सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळांमध्ये पुन्हा मुलांचा किलबिलाट सुरू!सिंधुदुर्ग जिल्ह्यात पालकांची लगबग

सुधीर राणे कणकवली : नवी कोरी पुस्तकं, वह्या... नव्या मित्र-मैत्रिणी... नवीन वर्गात बसण्याची उत्सुकता... नवा युनिफार्म... काहींसाठी तर नवी शाळा... मनात थोडीशी भीतीही... शाळेचे नाव काढताच रडवेले झालेले चेहरे... रडणाऱ्या मुलांना वर्गात बसविण्यासाठी शिक्षकांची धावपळ... विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांनी केलेली जय्यत तयारी... अशा वातावरणात आणि मुलांच्या किलबिलाटात कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा सोमवारी पुन्हा एकदा बोलक्‍या झाल्या.जिल्हाभरातील शाळा सुरू होण्याचा सोमवारी तसा पहिला दिवस होता. त्यामुळे मुलांबरोबरच पालकांची लगबग सकाळपासूनच सुरू होती. शाळा म्हणजे आई-वडिलांपासून लांब जाणं शाळा म्हणजे कडक शिक्षक, शाळा म्हणजे फक्त अभ्यास असा विचार करीत रडविल्या चेहऱ्यांनी काही नवागत मुलांचे शाळेत पहिले पाऊल पडले. शाळेच्या पहिल्या दिवशी विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे मोठया उत्साहात स्वागत करण्यात आले. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पुष्प , चॉकलेट्‌स आणि भेटवस्तू देखील देण्यात आल्या.नवा गणवेश परिधान करून आलेल्या या मुलांनी नवे मित्र-मैत्रिणी आणि शिक्षकांशी पहील्याच दिवशी गट्टी देखील केल्याचे अनेक शाळांमध्ये दिसून आले . आई-वडिलांपासून दूर जाण्याच्या भीतीने रडू कोसळलेल्या मुलांच्या चेहऱ्यावर शाळेतील जल्लोष पाहून हसू उमलले. अवघ्या काही क्षणात रडू विसरून इयत्ता पहिलीत प्रवेश केलेली मुले शाळेतील नवे मित्र, वर्ग, शाळेचे पटांगण यामध्ये रमून गेली होती.' आम्ही यावर्षी प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत आलो आहोत. त्यामुळे आम्हाला छान वाटत आहे. नवीन शिक्षक, नवीन मित्र कसे असतील याबद्दल उत्सुकता आहे. नवीन वर्ग, नवीन विषय... हे सगळंच खूप आनंददायी आहे.' अशी प्रतिक्रिया पाचवी मध्ये प्रवेश घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यानी व्यक्त केली. ' मुलांसाठी शाळेचा पहिला दिवस खास असतो, त्यामुळे आज ऑफिसमधून सुटी घेऊन मुलाला सोडायला शाळेत आलो आहे. नवीन विषयांचा अभ्यास मुलांकडून करून घेणे, हे एक आव्हान आहे. अशा प्रतिक्रिया काही पालकांनी व्यक्त केल्या. एकंदर मुलांसाठी आणि पालकांसाठी शाळेचा पहिला दिवस तसा धावपळीचाच ठरला.....आणि गप्पांचे फड रंगले !परीक्षा संपून उन्हाळी सुट्टीवर गेलेली मुले सोमवारी पुन्हा शाळेत परतली. सुट्टीमध्ये केलेल्या गमती जमतींबाबत मित्र , मैत्रिणींना माहिती देताना अनेक मुले दिसत होती. त्यांचे गप्पांचे फड चांगलेच रंगले होते. 

 

टॅग्स :Schoolशाळाsindhudurgसिंधुदुर्ग