शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘किंगमेकर’च्या भूमिकेत सावंतवाडीच

By admin | Updated: May 18, 2014 00:30 IST

अनंत जाधव ल्ल सावंतवाडी सावंतवाडी विधानसभा शिवसेनेसाठी लकी ठरला आहे. कारण या मतदार संघातूनच नूतन खासदार विनायक राऊत यांच्या

अनंत जाधव ल्ल सावंतवाडी सावंतवाडी विधानसभा शिवसेनेसाठी लकी ठरला आहे. कारण या मतदार संघातूनच नूतन खासदार विनायक राऊत यांच्या विजयाची घोडदौड सुरू झाली आहे आणि काँग्रेसचा पर्यायाने नारायण राणे यांचा राजकारणातील वारू रोखण्यात आमदार दीपक केसरकर यांना यश आले. त्यामुळे सावंतवाडी मतदार संघच राऊतांच्या विजयाचा किंगमेकरच्या भूमिकेत राहिला आहे. राऊतांचा विजय झाला असला तरी त्यांच्या विजयाचे खरे हिरो दीपक केसरकर ठरले आहेत आणि काँग्रेसला या मतदार संघासाठी नेतृत्व शोधण्याची वेळ आली आहे. सावंतवाडी विधानसभा मतदार संघ म्हणजे सावंतवाडी दोडामार्ग व वेंगुर्ले या तिन्ही तालुक्यांचा विभाग आहे. हा मतदार संघ तसा पहिल्यापासून काँग्रेसचा बालेकिल्ला असून मध्यंतरी शिवसेनेने यावर झेंडा रोवला होता. त्यानंतर या मतदार संघात राष्ट्रवादी काँॅग्रेसने आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वादामुळे या मतदार संघात काय होणार, याचीच उत्सुकता कायम होती. या मतदारसंघाचा अभ्यास केला असता राष्ट्रवादीचा आमदार आणि सावंतवाडी नगरपालिका राष्ट्रवादीकडे व दोडामार्ग पंचायत समिती वगळता मतदारसंघातील सर्व सत्ताकेंद्रे ही काँग्रेसकडे होती. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँॅग्रेस व काँग्रेस एकत्रपणे लढले. या निवडणुकीत ६८ हजार एवढी मते आमदार दीपक केसरकर यांना पडली. शिवसेनेच्या उमेदवाराला ४५ हजार तर अपक्ष उमेदवार प्रवीण भोसले यांना १८ हजार मते पडली होती. पण या निवडणुकीत केसरकरांना पडलेली मते ही धनुष्यबाणाच्या पारड्यात टाकण्यात यश मिळविले. तसेच आपल्यापेक्षा आणखी २० हजार मतेही त्यांना जास्त मिळाली आणि काँग्रेसची गाडी फक्त ४७ हजारावर येऊन थांबली. शिवसेनेला या मतदारसंघात ८८ हजार मते मिळाली आहेत. या मतदार संघातील सर्वाधिक ४१ हजारांचे मताधिक्य महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांना मिळाले आहे. या मताधिक्यावर आमदार दीपक केसरकर यांची छाप उमटलेली दिसत आहे. केसरकर यांनी दहशतवादाविरोधाचा मुद्दा पकडत उघडपणे धनुष्यबाण हाती घेतला होता. याचा फटका काँग्रेसच्या उमेदवारास बसला त्याशिवाय काँग्रेसकडे कार्यकर्त्यांची फळी असूनही त्यांना त्याचा योग्य वापर करता आलेला नाही. कारण या मतदार संघात मोदी लाटेबरोबरच काँग्रेसविरोधात मोठी नाराजी दिसून आली. कळणे मायनिंग असो अगर साटेली मायनिंग, प्रकल्पग्रस्तांना मिळणार्‍या अपुर्‍या सुविधा, त्यांच्या समस्या, जिल्ह्यातील अनेक बंद झालेले प्रकल्प आलेली बेकारीची कुºहाड तसेच काँग्रेसकडून सत्तेच्या माध्यमातून गावागावात कार्यकर्त्यांकडून होणारी अरेरावी याचाही परिणाम या निकालावर झाल्याचे दिसून आला आहे. या निवडणुकीत सावंतवाडी मतदार संघ हा राऊतांना जास्त मताधिक्क देत किंगमेकरच्या भूमिकेत दिसून आला आहे. या मताधिक्यामुळेच काँग्रेसचा रत्नागिरी-सिंधुदुर्गातील वारू शिवसेनेने रोखला आहे. यावेळी शिवसेनेला मिळालेले मताधिक्य हे शहरी भागातही मोठे आहे. त्यामुळे यावेळी ग्रामीण भागाबरोबर शहरी भागही शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभा राहिल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. शिवसेना आणि काँग्रेस यांच्या मतदानाची आकडेवारी ही लाखांच्या घरात जाऊन पोहोचल्याने काँग्रेसला भविष्यात पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी अधिक मेहनत करावी लागणार आहे. काँग्रेसला या निवडणुकीच्या निमित्ताने सावंतवाडीत मतदारसंघात खंबीर नेतृत्त्वाची गरज भासली आहे. सध्याची काँग्रेस मोठ्या प्रमाणात गटातटात विभागली गेल्याचे चित्र दिसून येत आहे. काँग्रेसला विधानसभा निवडणूक लढवायची असल्यास त्यांना या मतदारसंघासाठी खंबीर नेतृत्व उभे करावेच लागेल. अन्यथा भविष्यात आमदार दीपक केसरकर यांना रोखणे काँग्रेसला अवघड जाणार आहे. इतर ठिकाणापेक्षा इथे राऊत यांना मताधिक्य अधिक असतानाही हा केवळ मोदी इफेक्ट अशीच भूमिका काँग्रेसने ठेवली तर ती घोडचूक ठरेल.