शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

घड्याळी तासिका शिक्षकांचे मानधन होणार तरी केव्हा?, कुटुंबावर उपासमारीची वेळ

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: September 13, 2022 19:00 IST

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी या प्रश्नात लक्ष घालण्याची मागणी शिक्षकांमधून होत आहे.

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची पदे रिक्त आहेत. काही ठिकाणचे शिक्षकांच्या रजा कालावधीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शासनाच्या आदेशानुसार शिक्षण संस्थांच्या माध्यमातून घड्याळी तासिका शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात येतात. परंतु या शिक्षकांचे मानधन मागील अनेक महिन्यांपासून रखडले असल्याने त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे मानधन तातडीने देण्याची मागणी या शिक्षकांमधून होत आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी या प्रश्नात लक्ष घालण्याची मागणी  शिक्षकांमधून होत आहे.माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता हा नेहमीचाच विषय राहिला आहे. गेली काही वर्षे भरती प्रक्रिया बंद आहे. शिक्षकांच्या भरतीची मागणी सातत्याने होत असताना शिक्षक भरती होताना दिसत नाही. त्यामुळे शिक्षकांच्या कायमस्वरूपी प्रश्नावर घड्याळी तासिका शिक्षकांचा तात्पुरता उपाय शासन, प्रशासनाकडून केला जात आहे. परिणामी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात घड्याळी तासिका तत्वावर अनेक शिक्षक ज्ञानार्जनाचे कार्य करीत आहेत.शिक्षणमंत्री येथे लक्ष देतील काय?राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शिक्षकांच्या या गंभीर विषयात लक्ष घालून घड्याळी तासिकांवर काम करणार्या शिक्षकांना न्याय मिळवून देणे आवश्यक बनले आहे.प्रशासनातील काही चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे उच्चशिक्षित युवक, युवती जे समाज घडविण्यासाठी धडपड करत आहेत. त्यांच्या श्रमाचे मोलदेखील वेळेत मिळत नाही. ही मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे मंत्री केसरकर यांनी या शिक्षकांना न्याय देण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे.

वेळेते मानधनाची शासनाची जबाबदारीतासिकांवर शिकविणारे शिक्षक उच्च शैक्षणिक पात्रताधारक आहेत. परंतु नोकरी मिळत नसल्याने अल्प मानधनात शाळेत शिक्षणाचे कार्य करीत आहेत. त्यांना वेळेत मानधन देण्याची जबाबदारी शासनाची आहे.

प्रतितास १०० रूपये कराघड्याळी शिक्षकांना हायस्कूलकरीता ७२ रूपये तास मानधन दिले जाते. माध्यमिककरीता ५४ रूपये प्रतितास दिले जातात. महागाईचा विचार करता १०० रूपये प्रतितास मानधनात वाढ होण्याची आवश्यकता आहे. तशी वाढ व्हावी, अशी मागणी शिक्षकांची आहे.शिक्षकांनी उपाशीपोटी शिकवावे कसे ?चार ते सहा महिन्यांपासून शिक्षकांना मानधन देण्यात आलेले नाही. घड्याळी तासिका शिक्षकांना शासनाकडून प्राप्त निधीतून शासनाकडून मानधन दिले जाते. त्यामुळे पाच ते सहा महिने या शिक्षकांनी उपाशीपोटी शिकवावे कसे, कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवावा कसा ? असे अनेक प्रश्न शिक्षकांसमोर निर्माण झाले आहेत.अंत पाहू नकावेळेत मानधन मिळत नसल्याने प्रतीक्षा संपता संपेना, अशी अवस्था या शिक्षकांची आहे. प्रशासनाने आमच्या संयमाचा अंत पाहून नये, रखडलेले मानधन तातडीने द्यावे, अशी मागणी या शिक्षकांनी केली आहे.मालवण येथील भंडारी एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर म्हणतात....या राज्याच्या शिक्षण खात्यात, त्यातही सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रचंड गोंधळ आहे. भंडारी हायस्कूल इथे तासिका तत्वावर शिक्षक म्हणून काम करणाऱ्या या गुरुजनांना आज ६-७ वर्षे झाली तरी अद्याप पगार नाही. त्यासाठी अनेकदा प्रस्ताव दिला आणि  वारंवार पत्रव्यवहार केला तरीही यांचे  मंजुरीचे  पेपर पुढे सरकत नाहीत आणि यांना जाब विचारणारे कोणी नाही. एका बाजूला सातव्या वेतन आयोगाप्रमाणे संबंधित कर्मचारी मात्र भरमसाट वेतन घेत आहेत. यात न्याय मिळावा आणि याना लवकर त्यांचे पैसे त्यांना मिळावे एवढीच माफक अपेक्षा आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गTeacherशिक्षक