शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पाचलचा धोका टळला

By admin | Updated: July 2, 2015 00:27 IST

राजापूर तालुका : गाळ उपसल्याने पाण्याचा प्रवाह जैसे थे

राजापूर : पूर्व परिसरातून वाहणाऱ्या अर्जुना नदीचा वक्र झालेला प्रवाह शासनाच्या लघुपाटबंधारेच्या यांत्रिक विभागाने आतील गाळ उपसल्याने पाचल बाजारपेठेला निर्माण झालेला धोका टळला आहे.पाचल बाजारपेठेला मागील काही वर्षांपासून अर्जुना नदीचा धोका होता. दरवर्षी महापुराच्या पाण्यात नदीकाठची होणारी धूप यामुळे लगतच्या ओणी, अणुस्कुरा मार्गासहीत पाचल बाजारपेठेला धोका वाढला होता. दरवर्षी तो वाढतच होता. हा धोका लक्षात घेऊन मागील अनेक वर्षे प्रशासकीय पातळीवर अनेकवेळा पत्रव्यवहाराद्वारे प्रयत्न करण्यात आले. पण ते अपूर्ण पडले. परिणामी पाचल बाजारपेठेला निर्माण झालेला धोका कायम होता. या पार्श्वभूमीवर पाचलचे माजी ग्रामपंचायत सदस्य व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शंकर ऊर्फ अण्णा पाथरे यांनी सातत्याने जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला होता. बाजारपेठेला निर्माण झालेल्या धोक्याबाबत उपाययोजना त्यांनी करण्याबाबत विनंती केली होती.त्याची दखल प्रशासनाने घेतली व पाचल बाजारपेठेला निर्माण झालेला धोका दूर करण्यासाठी अर्जुना नदीपात्रातील एकूण तीन ठिकाणी गाळ उपशाचे काम हाती घेतले. काही फूट नदीपात्रातील गाळ उपसून तो काठावर टाकण्यात आला. यामुळे नदीचे पात्र अधिकच रुंद झाले.या कामाचे भूमिपूजन ग्रामपंचायत सदस्या उमा शंकर पाथरे यांच्या हस्ते पार पडले. त्याप्रसंगी गावचे उपसरपंच किशोर नारकर, लघुपाटबंधारे विभागाचे कशेळकर, भोसले, एकनाथ शेलार, किसन शेलार, मनोहर पाटील, ग्रामस्थ शिरीष सक्रे, सुशांत वायकूळ, अण्णा पाथरे, प्रसाद पायरे, मंगेश पाथरे, गजानन नेवरेकर, हेमंत नारकर, वसंत चव्हाण, विजय लांजेकर, राजन लब्धे, बब्या बंदरकर उपस्थित होते. अर्धा ते १ किमीच्या भागात नदीच्या प्रवाहाचा धोका निर्माण झाला होता. नेमके त्याच ठिकाणी पाचल पेठवाडीवासीयांची स्मशानभूमी, जांगलदेव देवस्थान व गणेश विसर्जन घाट अशी महत्त्वाची ठिकाणे होती. पावसाळी दिवसात अर्जुना नदीला महापूर आल्यानंतर लगतची स्मशानभूमी पाण्याखाली जायची. त्यामुळे अडचण होत असे. गणेश विसर्जनाच्या वेळीही पुराच्या पाण्यामुळे अडथळा यायचा. या सर्व समस्यांबाबत पाचलचे सामाजिक कार्यकर्ते अण्णा पाथरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर अडचण समजावून सांगितली. शिवाय सातत्याने पत्रवहार करुन पाठपुरावा सुरुच ठेवला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. प्रशासनाने सरत्या उन्हाळी हंगामात जेसीबी मशिनद्वारे अर्जुना नदीपात्रात साचलेल्या अनावश्यक गाळाचा उपसा केला. त्यामुळे सुरु झालेल्या पावसाळ्यात नदीला आलेल्या पहिल्या पुराचा प्रवाह संथ होता. परिणामी पाचल बाजारपेठेला निर्माण झालेला धोका टळला आहे.प्रशासनाने योग्यवेळी कार्यवाही केल्याने पाचलचे सामाजिक व राजकीय कार्यकर्ते अण्णा पाथरे यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभागासहीत त्यांच्या यांत्रिक विभागाचे अधिकारी यांना धन्यवाद दिले आहेत. (प्रतिनिधी)