शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत पुन्हा अतिक्रमण हटाव

By admin | Updated: June 7, 2015 00:45 IST

मुख्याधिकाऱ्यांचे नेतृत्व : संदेश पारकरांनी विक्रेत्यांची बाजू मांडली

कणकवली : कणकवली शहरात नगरपंचायत प्रशासनाच्यावतीने शनिवारी पुन्हा महामार्गाच्या दुतर्फा असलेले तसेच पदपथावरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्यात आली. दरम्यान, काँग्रेसचे युवा नेते संदेश पारकर यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे विक्रेत्यांची बाजू मांडली. मात्र, अतिक्रमणाबाबत काही नागरिकांनी तक्रारी केल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार अतिक्रमण हटविण्यात येत असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. शहरातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण तसेच पदपथावर काही विक्रेत्यांनी केलेले अतिक्रमण नगरपंचायत प्रशासनाच्यावतीने हटविण्यात येत आहे. बुधवारी या अतिक्रमणांवर कारवाई केल्यानंतर शुक्रवारी पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. काही विक्रेत्यांकडून दंडही वसूल करण्यात आला. शनिवारी सायंकाळी पुन्हा अतिक्रमण हटविण्यासाठी शहरातील आप्पासाहेब पटवर्धन चौकात मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्यासह नगरपंचायतीचे कर्मचारी आले होते. यावेळी काही विक्रेत्यांनी या मोहिमेबाबत संदेश पारकर यांना माहिती दिल्याने ते आप्पासाहेब पटवर्धन चौकात दाखल झाले. तसेच विक्रेत्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्यांची बाजू मुख्याधिकाऱ्यांकडे त्यांनी मांडली. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येणार असल्याने महामार्गाच्या दुतर्फा असणाऱ्या विक्रेत्यांना विस्थापित व्हावे लागणार आहे. त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने माणुसकीच्या भावनेतून तोपर्यंत विक्रेत्यांना महामार्गाच्या दुतर्फा व्यवसाय करु द्यावा. अशी मागणी पारकर यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे अतिक्रमणाबाबत काही नागरिकांनी तक्रारी केल्यामुळे त्यांच्या सुचनेनुसार नगरपंचायत प्रशासन अतिक्रमण हटवित असल्याचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपण अतिक्रमण हटावबाबत चर्चा करा, असेही मुख्याधिकाऱ्यांनी पारकर यांना सांगितले. यावेळी नगरसेवक रुपेश नार्वेकर, बाळा बांदेकर यांच्यासह भाजी विक्रेते बहुसंख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)