शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

रिमझिम पावसाने बागायतदार धास्तावले

By admin | Updated: February 28, 2015 23:28 IST

कणकवली, देवगडसह कुडाळ भागात शिडकावा

पुरळ : वारंवार समस्येच्या गर्तेत असलेल्या आंबा बागायतदारांसमोर पुन्हा एकदा ढगाळ वातावरण व रिमझिम पावसाचे संकट आले असल्याने आंब्यावर अनेक रोग फैलावण्याची भीती निर्माण झाली आहे. शनिवारी सकाळच्या सत्रात जिल्ह्यात काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडला. कणकवली, कुडाळ, देवगड परिसरात शनिवारी सकाळी काळे ढग भरून आले आणि काही मिनिटे पावसाच्या सरी कोसळल्या. बुरशीचे संकटही उभे ठाकले असून, आंबा पिकाला अनेक रोगांचा सामना करावा लागणार आहे. यासाठी कृषी विभागाकडून योग्य ती माहिती घेऊन आंबा फवारणी हाताळली पाहिजे. नोव्हेंबर महिन्यामध्ये आंबा कलमांना मोहोर येण्यास सुरुवात झाली. तीन टप्प्यांत येणारा मोहोर यावर्षी पाच टप्प्यांत येऊन वारंवार फूट झाल्याने सुरुवातीच्या आंब्यांची गळ होत राहिली. याचा फटका बऱ्याचशा प्रमाणात आंबा बागायतदारांना बसला असतानाच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने आता थ्रीप्स, तुडतुडे व अन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. युरोपीय राष्ट्रांनी आंब्यावरील बंदी उठविल्यामुळे आंब्याला मागणी वाढणार आहे. यामुळे चांगला भाव मिळण्याची शक्यता असल्याने आंबा बागायतदार समाधानी होता. मात्र, बागायतदारांच्या समाधानावर अवेळी पडणाऱ्या पावसाने विरजण टाकले आहे. फळधारणा झालेल्या आंब्यांवर डाग पडण्याची शक्यता आहे. मोहोर असलेल्या कलमांचे बऱ्याच प्रमाणात नुकसान होऊ शकते. हा मोहोर पावसाच्या पाण्याने काळा पडून त्याठिकाणी फळधारणा होत नाही. यावर्षी बऱ्याच प्रमाणात कीटकनाशकांच्या अतिरिक्त फवारण्या करण्यात आल्या. त्यामुळे आंबा मोहोरावर फळधारणा होण्यासाठी होणारे परागीकरण झाले नसल्याने शेवटच्या टप्प्यातील आलेल्या मोहोराला फळधारणा झाली नाही. यामुळे कृषी सल्ल्यानुसार बदलत्या वातावरणामध्ये आंबा पीक टिकविण्यासाठी बागायतदारांनी कसोशीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. रिमझिम पाऊस पडत राहिला तर आंबा पीक यावर्षी संपुष्टात येण्याची भीती आहे, तर पावसाबरोबर वारा सुटल्यास फळधारण झालेल्या आंब्याची गळ होऊन मोठ्या प्रमाणात नुकसानीही होऊ शकते. या शक्यतांनी आंबा बागायतदार सध्या चिंतातुर झाले आहेत. (वार्ताहर)