शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
3
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
4
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
5
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
6
Suvendu Adhikari : "हिंदूंनी ममतांना धडा शिकवला, अत्याचारांचा बदला मतदानातून घेतला", शुभेंदु अधिकारी कडाडले
7
पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी ६:३० वाजता भाजप मुख्यालयात; ममता बॅनर्जींनी मोठी आघाडी उघडली... 
8
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
9
अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
10
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
11
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
12
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
13
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
14
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
15
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
16
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
17
West Bengal: ममता बॅनर्जींच्या आधी बंगालमध्ये कोणाची होती हुकूमत? जाणून घ्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास
18
Canara Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹९५,३०० चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटी
19
जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे
20
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
Daily Top 2Weekly Top 5

जनता उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी सज्ज

By admin | Updated: November 22, 2014 00:13 IST

वैभव नाईक : मालवण येथे दौऱ्याबाबत दिली माहिती

मालवण : लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीतही कोकणवासीयांनी शिवसेनेला भरघोस यश देऊन येथील जनतेने शिवसेनेच्या पाठीशी आपण असल्याचे दाखवून दिले आहे. आणि म्हणूनच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे २२ व २३ नोव्हेंबर या दोन दिवशी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून ठाकरे यांच्या या दौऱ्यामुळे सिंधुदुर्गातील शिवसेनेत नवचैतन्याचे वातावरण पसरले आहे. शिवसेनेबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे, असे प्रतिपादन शिवसेना आमदार आणि सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी येथे बोलताना केले.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे २२ व २३ नोव्हेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून या दौऱ्याच्या नियोजनाच्या पूर्वतयारीसाठी आमदार वैभव नाईक हे शुक्रवारी मालवण येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासमवेत शिवसेना मालवण तालुकाप्रमुख बबन शिंदे, शहरप्रमुख नंदू गवंडी, राजा गावकर, महेश शिरपुटे, सतीश प्रभू आदी उपस्थित होते. पत्रकारांशी बोलताना आमदार नाईक म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा हा दौरा कौटुंबिक स्वरूपाचा असून विधानसभा निवडणुकीत कोकणवासियांनी शिवसेनेला जे यश दिले त्या यशाबद्दल जनतेचे ऋण मानण्यासाठी ठाकरे हे दौऱ्यावर येत असल्याचे सांगून नाईक म्हणाले, शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता आचरा येथे तर सायंकाळी ६ वाजता मालवण येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वागत होणार आहे. ठाकरे यांच्यासमवेत खासदार विनायक राऊत तसेच कोकणातील सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत.नाईक म्हणाले, या दौऱ्यात ठाकरे हे समाजातील विविध घटकांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेणार आहेत. तसेच पर्यटनाच्या दृष्टीने मालवणातील स्कुबा डायव्हींग व्यावसायिकांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न समजावून घेणार आहेत. यानिमित्त सिंधुदुर्ग किल्ल्यावर भेट देऊन पर्यटनाच्यादृष्टीने सिंधुदुर्ग किल्ल्याचा विकास कसा करता येईल, यादृष्टीने पाहणी करणार आहेत. (प्रतिनिधी)