शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी-सिंधुदुर्गातील सहाजणांचे यश

By admin | Updated: June 7, 2015 00:52 IST

ब श्रेणी प्राप्त : आकाशवाणीच्या स्वरचाचणी स्पर्धेला उत्तम प्रतिसाद

रत्नागिरी : रत्नागिरी, सिंंधुदुर्ग जिल्ह्यातील सहाजणांची आकाशवाणीचे मान्यताप्राप्त गायक म्हणून निवड झाली आहे. रत्नागिरीचे अभिषेक भालेकर, प्रेरणा दामले, प्रसाद शेवडे आणि अभिजित नांदगावकर, तर सिंंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वप्नील गोरे आणि वैदेही करंबेळकर यांना आकाशवाणीची ‘बी ग्रेड’ प्राप्त झाली आहे. मे महिन्यात आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावर ‘शास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, सुगम संगीत’ गायनाची स्वरचाचणी घेण्यात आली. रत्नागिरी, सिंंधुदुर्ग जिल्ह्यातील मिळून एकूण ३४ जणांनी ही स्वरपरीक्षा दिली होती. सुगम व नाट्यसंगीतासाठी सहाही कलाकार उत्तीर्ण झाले आहेत. सुगमसंगीतामध्ये अभिषेक भालेकर, प्रेरणा दामले, प्रसाद शेवडे, अभिजित नांदगावकर आणि वैदेही करंबेळकर, तर नाट्यसंगीतामध्ये प्रेरणा दामले आणि स्वप्नील गोरे हे उत्तीर्ण झाले आहेत. या स्वरचाचणीसाठी अभिजित नांदगावकर, अभिषेक भालेकर, वैदेही करंबेळकर, स्वप्नील गोरे, प्रसाद शेवडे यांना रत्नागिरीतील आकाशवाणीचे मान्यताप्राप्त संगीतकार अवधूत बाम यांचे मार्गदर्शन लाभले. यासाठी या साऱ्यांनी अवधूत बाम यांनी संगीतबद्ध केलेली गाणी गायली. या स्वरपरीक्षेसाठी एकूण १५ अनरेकॉर्डेड गाणी गायची होती. तशी १५ गाण्यांची यादी अर्जासोबत जोडायची होती. एक स्वत:च्या आवडीचे व दुसरे परीक्षकांनी सांगितलेले अशी दोन गाणी स्वरचाचणी दरम्यान गायकांनी गायली. स्वरचाचणी आकाशवाणीच्या रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये मे महिन्यात घेण्यात आली. केवळ तानपुरा आणि तबला या दोन वाद्यांवरच गायक कलावंतांचा या स्वरचाचणीसाठी कस लागतो. या सर्व कलावंतांचे रत्नागिरीतील संगीत व सांस्कृतिक क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. (प्रतिनिधी)