शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

रेशनकार्डलाही ‘आधार’ अनिवार्य

By admin | Updated: November 22, 2014 00:13 IST

शिरगावात ग्रामस्थांची लगबग : धान्य दुकानदारांकडे कार्ड जमा करा

शिरगांव : कौटुंबिक शिधावाटप पत्रिकांना (रेशनकार्डाला) आता या महिन्याअखेरपर्यंत आधारकार्ड जोडणे शासनाने अनिवार्य केल्याने आधारकार्ड काढण्यासाठी शिरगांव दशक्रोशीतील ग्रामस्थांनी एकच लगबग सुरु झाली आहे. रेशनकार्डधारकांनी यापूर्वी नवीन रेशनकार्ड मिळण्यासाठी भरलेल्या अर्जांना आता आधारकार्डची झेरॉक्स, रेशनकार्डची झेरॉक्स, राष्ट्रीयकृत बँकेतील संयुक्त बँक खात्याची झेरॉक्स, रेशनकार्डवरील कुटुंब प्रमुखाचा फोटो, कुटुंबप्रमुख जर पुरुष असेल तर त्या रेशनकार्डातील नमूद स्त्री कुटुंब प्रमुखाचा फोटो व तिच्या आधारकार्डची झेरॉक्स येत्या महिन्याअखेर रास्त दराच्या धान्य दुकानदाराकडे जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.शिरगाव येथील जिल्हा बँकेत यापूर्वी आधारकार्डची नोंदणी करण्याची सुविधा सुरु होती. गेली काही महिने येथील आधारकार्ड नोंदणी करण्याच्या मशिनमध्ये बिघाड झाल्याने नोंदणी बंद करण्यात आली होती. शुक्रवार २१ नोव्हेंबर रोजी येथील जिल्हा बँकेच्या शाखेत नवीन मशिनरी बसविण्यात आली असून या मशिनची २२ नोव्हेंबरला चाचणी घेण्यात येणार आहे. या चाचणीनंतर जिल्हा बँकेच्या शिरगाव शाखेत लवकरच आधारकार्डची नोंदणी पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे शाखा व्यवस्थापक रावजी चिंदरकर यांनी दिली आहे.जिल्हा बँकेत आधारकार्ड नोंदणी बंद झाल्याने व महिना अखेरपर्यंत रेशनकार्डच्या फॉर्मला आधारकार्डची झेरॉक्स जोडण्यास कमी अवधी असल्यामुळे ग्रामस्थांची एकच धावपळ सुरु झाल्याचे चित्र आहे.रेशनकार्ड बरोबरच आता सिलेंडर धारकांनाही आधारकार्ड जोडणे सक्तीचे केले असून गॅस धारकांना आता मोबाईलवरही याबाबत संदेश पाठविण्यात आले आहेत.शिरगांव दशक्रोशीतील ग्रामस्थांना यापूर्वी आधारकार्ड काढण्यासाठी देवगड किंवा तळेबाजार येथे जावू लागत होते. त्यामुळे वेळ व आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता. त्यानंतर येथील जिल्हा बँकेच्या शाखेतही सुविधा सुरु करण्यात आली. वाडीवार ग्रामस्थांसह आजूबाजूच्या गावात, माध्यमिक शाळा, महाविद्यालयात कॅम्प आयोजित करुन येथील ग्रामस्थांची आधारकार्ड काढण्याची सोय करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात ही सेवा बंद होती. आता पुन्हा ही सेवा सुरु झाल्यामुळे ग्रामस्थांत समाधान व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)