शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
3
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
4
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
5
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
6
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
7
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
8
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
9
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
10
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
11
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
12
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
13
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
14
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
15
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
16
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
18
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
19
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
20
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली तालुक्यात पावसाचा जोर कायम: महामार्गावर खड्डेच खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 11:24 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कणकवली तालुक्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून रविवारी सकाळपासून अधून-मधून जोरदार पावसाच्या सरी कोसळत होत्या. मात्र, या पावसाने कुठेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची नोंद आपत्ती नियंत्रण कक्षात झालेली नव्हती.

ठळक मुद्दे कणकवली तालुक्यात पावसाचा जोर कायम: महामार्गावर खड्डेच खड्डेनद्या, नाले पुन्हा एकदा तुडुंब : महामार्गावर खड्डेच खड्डे

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कणकवली तालुक्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून रविवारी सकाळपासून अधून-मधून जोरदार पावसाच्या सरी कोसळत होत्या. मात्र, या पावसाने कुठेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची नोंद आपत्ती नियंत्रण कक्षात  झालेली नव्हती.कणकवली तालुक्यात मागील दोन-चार दिवस जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे तालुक्यातील नद्या, नाल्यांची पुन्हा पाण्याची पातळी वाढली आहे. यावर्षी पाऊस काहीसा उशिराने पडायला सुरुवात झाली होती. मात्र, गतवर्षीप्रमाणेच तालुक्यात पावसाने आतापर्यंत सरासरी गाठली आहे. या सातत्यपूर्ण पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे.गेला आठवडाभर जोरदार पडणाºया पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचत आहे. त्यामुळे वाहनचालकांना या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने किरकोळ अपघाताच्या घटना घडत आहेत.कणकवली शहरालगत असलेल्या गडनदी व जानवली नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे पादचाऱ्यांवर चिखलाचे पाणी उडत आहे.रविवारी मुंबई-गोवा महामार्गावरील प्रांताधिकारी कार्यालयासमोरून जाणाऱ्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते.

त्यामुळे या रस्त्यावरून चालताना पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. तसेच वाहन चालकांनाही वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत होती. पाऊस थांबल्यावर येथील पाणी ओसरले. अशीच स्थिती शहरातील काही ठिकाणच्या रस्त्यांवर दिसून येत होती.वाहनचालकांना करावी लागतेय कसरतमुंबई-गोवा महामार्गावर दोन आठवड्यांपूर्वी नव्याने पावसाळी डांबरीकरण करून महामार्ग तयार केला होता. ज्याठिकाणी खड्डे पडले होते त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात महामार्गाच्या ठेकेदाराने खड्डे बुजविले होते. मात्र, दोन आठवड्यांनंतर पुन्हा महामार्गावर खड्डे पडल्याने वाहनचालकांना या मार्गावर मोठी कसरत करावी लागत आहे. गेले दोन दिवस पुन्हा पावसाची रिपरिप सुरू झाल्याने त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून खड्डे मोठे होत आहेत. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. 

टॅग्स :Rainपाऊसroad safetyरस्ते सुरक्षाsindhudurgसिंधुदुर्ग