शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
4
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
5
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
6
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
7
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
8
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
9
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
11
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
12
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
15
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
16
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायत परिसरात ठेकेदाराला धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 12:15 IST

वैभववाडी येथील नगरपंचायत कार्यालय परिसरात मजूर संस्था असलेल्या एका ठेकेदाराला नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यासह त्यांच्या समर्थकांनी धक्काबुक्की केली. जवळच असलेल्या अन्य कार्यकर्त्यांनी ठेकेदाराला सोडवून घेतले. त्यामुळे तो बचावला. या मारहाणीचे कारण गुलदस्त्यात असून सायंकाळी उशिरापर्यंत या प्रकाराची शहरात चर्चा सुरू होती.

ठळक मुद्देनगरपंचायत परिसरात ठेकेदाराला धक्काबुक्की पदाधिकाऱ्याशी झालेल्या वादाचा परिणाम

वैभववाडी : येथील नगरपंचायत कार्यालय परिसरात मजूर संस्था असलेल्या एका ठेकेदाराला नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यासह त्यांच्या समर्थकांनी धक्काबुक्की केली. जवळच असलेल्या अन्य कार्यकर्त्यांनी ठेकेदाराला सोडवून घेतले. त्यामुळे तो बचावला. या मारहाणीचे कारण गुलदस्त्यात असून सायंकाळी उशिरापर्यंत या प्रकाराची शहरात चर्चा सुरू होती.

नगरपंचायतीमध्ये आढावा सभेचे आयोजन केले होते. सभा संपल्यानंतर नगरपंचायतीचे पदाधिकारी आणि पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते नगरपंचायतीच्या मुख्य दरवाजानजीक थांबून काही विषयांवर चर्चा करीत होते. ही चर्चा सुरू असताना एक माजी नगराध्यक्ष आणि त्या ठेकेदारामध्ये काही मुद्यांवरून वाद निर्माण झाले. आपल्यामुळेच नगरपंचायत निवडणूक जिंकता आली, अशा अविभार्वात वावरणाऱ्या या ठेकेदाराने त्या पदाधिकाऱ्यांवर आवाज चढविला.

त्यामुळे त्या पदाधिकाऱ्याच्या रागाचा पारा चढला. त्यामुळे त्याच्यासह त्याच्या काही समर्थकांनी त्या ठेकेदाराला धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. एकाने तर त्याच्या कानशिलात लगावल्याची चर्चा आहे. हा प्रकार सुरू असतानाच काही पदाधिकाऱ्यांनी त्या ठेकेदाराला सोडवून घेतले. मात्र, त्या पदाधिकाऱ्यांचे समर्थक त्याला शिवीगाळ करीत होते.

नगरपंचायत परिसरात मारामारी झाल्याची चर्चा अवघ्या काही मिनिटांत वैभववाडी शहरात पोहोचली. शहरातील अनेकांनी नगरपंचायतीकडे धाव घेतली. हा प्रकार पाहण्यासाठी काहींनी गर्दी केली होती. परंतु या धक्काबुक्कीचे नेमके कारण काय हे समजू शकलेले नाही. या प्रकाराची चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग