शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

तरंदळे प्रकल्पासाठी ४ कोटींची तरतूद

By admin | Updated: September 11, 2014 00:00 IST

संदेश पारकर : पायलट प्रोजेक्ट म्हणून प्रयत्न

कणकवली : तरंदळे लघुपाटबंधारे प्रकल्पावर डाव्या कालव्याच्या ठिकाणी हायडेन्सीटी पॉलिथिलीन पाईपलाईनद्वारे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचविण्याचा निर्णय देण्यात आला आहे. पायलट प्रोजेक्ट म्हणून या पाईपलाईनचा प्रयोग करण्यात येणार असून त्यासाठी ४ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती कोकण सिंचन पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली.कणकवली तालुक्यातील तरंदळे लघुपाटबंधारे प्रकल्प, घोणसरी मध्यम पाटबंधारे प्रकल्प, शिवडाव लघुपाटबंधारे प्रकल्पासह अन्य प्रकल्पांना संदेश पारकर यांनी मंगळवारी भेट दिली. तसेच या प्रकल्पाच्या उर्वरित कामाच्या नियोजनाची अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आंबडपाल येथील पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय गोडसे, उपविभागीय अभियंता व्ही. के. राठोड, शाखा अभियंता रवी माणगावकर, अवधूत मालणकर, डॉ. सत्यवान सावंत, महेश सावंत आदी उपस्थित होते.अधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्यानंतर संदेश पारकर म्हणाले, तरंदळे लघुपाटबंधारे प्रकल्पावर सुमारे ८० कोटी रूपये निधी खर्च झाला आहे. या धरणामध्ये सध्या ४.८३२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा करण्यात आला आहे. या पाण्याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ व्हावा, पाण्याचा अपव्यय टाळावा तसेच कालव्यांसाठी भूसंपादन करावे लागू नये यासाठी पाटबंधारे खात्याने या प्रकल्पावर डाव्या कालव्याच्या ठिकाणी कालव्याऐवजी हायडेन्सीटी पॉलिथिलीन पाईपलाईन टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात दीडशे हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. हे काम जून २०१५ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर १० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होणार आहे. तरंदळे येथे डाव्या कालव्याऐवजी टाकण्यात येणारी पाईपलाईन शेतकऱ्यांना सोयीची ठरणार आहे. नळ योजनेच्या धर्तीवरच त्याला वॉल्व्ह असणार आहे. तीन ते चार हेक्टर क्षेत्रावर ग्रुप करून हे पाणी पुरवले जाणार असून सुमारे ५ हॉर्सपॉवरची मोटर पाणी खेचेल एवढ्या पाण्याचा विसर्ग या पाईपलाईनद्वारे होणार असल्याचेही पारकर यांनी सांगितले. (वार्ताहर)