शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचा तपास योग्य दिशेने-युवतीवर झालेला अत्याचार

By admin | Updated: August 21, 2014 00:26 IST

संजयकुमार बाविस्कर : आपल्यावर कोणताही दबाव नसल्याची माहिती

सिंधुदुर्गनगरी : सावंतवाडीमध्ये अल्पवयीन युवतीवर झालेला अत्याचार हा तिच्या ओळखीच्या (जवळच्या) नात्यातील व्यक्तींनी केला आहे. या प्रकरणाच्या तपासामध्ये आपल्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नाही. पोलीस योग्यप्रकारे तपास करीत आहेत आणि या प्रकरणातील सहाही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर यांनी दिली.याबाबत माहिती देताना पोलीस अधीक्षक म्हणाले, सावंतवाडीतील वासनाकांड उघड झाल्यानंतर अत्याचारीत युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार सावंतवाडीत पोलिसांनी सहा जणांवर गुन्हे दाखल करून सहाही संशयित आरोपींना अटक केली आहे. प्राथमिक चौकशीत संबंधित अत्याचारीत युवती आपल्या मामाकडे सावंतवाडीला रहात होती. याच कालावधीत तिच्या मामाचा मुलगा (अमित मोर्ये) याने तिच्याशी जवळीक साधली तर मामीच्या भावाच्या मुलाचे (नंदकिशोर गावडे) याचेही तेथे येणेजाणे सुरु होते. संबंधित युवतीशी त्यानेही जवळीक साधली होती. तिच्याशी अनेकवेळा लगट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महेश सावंत याच्याशी तिची मैत्री झाली. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखविले होते. तो तिच्यावर अत्याचार करीत होता. तर आदित्य आरेकर याची फेसबुकवर ओळख झाली होती. या मैत्रीचा गैरफायदा घेत त्याने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. याबाबत संबंधित मुलीने आपल्या आईला सांगितले होते. मात्र आईने तिची दखल घेतली नाही. म्हणून त्या युवतीने आपल्या काकाला याबाबत अत्याचार होत असल्याचे सांगितले. तेव्हा काकाने तिची वैद्यकीय तपासणी केली. मात्र पुढे कोणतीही दखल घेतली नाही. अखेर त्या संबंधित युवतीने वारंवार होणाऱ्या अत्याचारामुळे दुसरीकडे रहात असताना तिची सुफियान मेहबूब शेख याच्याशी ओळख झाली. त्यानेही तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार सुरु ठेवला.याबाबत त्या युवतीने सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर तत्काळ पाच संशयित आरोपींना अटक केली तर फरारी असलेला सुफियान शेख याला बुधवारी पहाटे बेळगाव येथून ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक बाविस्कर यांनी दिली. तर याबाबतच्या तपासात कोणताही राजकीय दबाव नाही. संबंधित युवतीची तक्रारीसाठी मानसिकता होण्यास विलंब लागला. तिला अभय देऊन त्यानंतरच कारवाई करण्यात आली आहे. याबाबत योग्य तपास होईल. कोणताही दबाव घेतला जाणार नाही. (प्रतिनिधी)योग्य न्याय मिळवून देवूसावंतवाडी येथील वासनाकांड ही गंभीर बाब आहे. यामध्ये संबंधित अत्याचारीत मुलीच्या नातेसंबंधातील मुलांकडूनच तिच्यावर अत्याचार झालेला आहे. या प्रकरणाच्या तपासात कोणताही राजकीय दबाव नाही. त्या अत्याचारीत मुलीला न्याय देण्याचे आमचे प्रयत्न राहतील, असेही यावेळी पोलीस अधीक्षक बाविस्कर यांनी सांगितले. जास्त शिक्षेसाठी प्रयत्नयामध्ये आणखी कोणाचा सहभाग असल्यास त्यालाही लवकरच ताब्यात घेऊ. अद्यापही तपास सुरु आहे. आवश्यक पुरावे गोळा करून अशा वाईट प्रवृत्तीला आळा बसावा यासाठी गुन्हेगारांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत, असे जिल्हा पोलीस उपअधीक्षक विनिता साहू यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.