शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

वैयक्तिक क्रीडा स्पर्धा ; सिंधुदुर्ग, रायगडची समाधानकारक खेळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2019 11:38 AM

४६ व्या कोकण परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेच्या चौथ्या दिवशी वैयक्तिक क्रीडा प्रकारात रत्नागिरी जिल्ह्याने ३ सुवर्ण पदकांसह वर्चस्व गाजविले. सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्याच्या खेळाडूंनी प्रत्येकी दोन सुवर्ण पदके आपल्या नावे केली. नवी मुंबईला एका सुवर्ण पदकावर समाधान मानावे लागले. मात्र, या दिवशी पालघर व ठाणे ग्रामीण जिल्ह्याची सुवर्ण पदकाची पाठी कोरी राहिली.

ठळक मुद्देवैयक्तिक क्रीडा स्पर्धा ; सिंधुदुर्ग, रायगडची समाधानकारक खेळीधावणे प्रकारात वैभव नार्वेकर प्रथम

सिंधुदुर्गनगरी : ४६ व्या कोकण परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेच्या चौथ्या दिवशी वैयक्तिक क्रीडा प्रकारात रत्नागिरी जिल्ह्याने ३ सुवर्ण पदकांसह वर्चस्व गाजविले. सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्याच्या खेळाडूंनी प्रत्येकी दोन सुवर्ण पदके आपल्या नावे केली. नवी मुंबईला एका सुवर्ण पदकावर समाधान मानावे लागले. मात्र, या दिवशी पालघर व ठाणे ग्रामीण जिल्ह्याची सुवर्ण पदकाची पाठी कोरी राहिली.येथील पोलीस क्रीडा मैदान व जिल्हा क्रीडा संकुल येथे या स्पर्धा सुरु असून शनिवारी ३० नोव्हेंबर रोजी याचा बक्षीस वितरण कार्यक्रमाने समारोप होणार आहे. चौथ्या दिवशी वैयक्तिक क्रीडा प्रकारात सिंधुदुर्ग जिल्ह्याने दोन सुवर्ण, तीन रौप्य, तीन कास्य पदक मिळविली. रत्नागिरी जिल्ह्याने तीन सुवर्ण पदक मिळविली. रायगड जिल्ह्याने दोन सुवर्ण, एक रौप्य मिळविले.

ठाणे ग्रामीणला एकही पदक मिळालेले नाही. नवी मुंबईला एक सुवर्ण, तीन रौप्य, तीन कास्य पदक मिळाली. पालघर जिल्ह्याला एक रौप्य व एक कास्य पदक मिळाले आहे. या सर्व खेळाडूंना शुक्रवारी सकाळी पोलीस निरीक्षक जगदीश काकडे, विनीत चौधरी, अविनाश भोसले यांच्याहस्ते प्रमाणपत्र व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.वैयक्तिक खेळातील पुरुष गटामधील १५०० मीटर धावणे प्रकारात सिंधुदुर्गचा वैभव नार्वेकर प्रथम, नवी मुंबईचे मनीलाल गावीत व योगेश जाधव अनुक्रमे द्वितीय, तृतीय आले. लांब उडी प्रकारात नवी मुंबईचे गुलाब मोरे, सचिन कोळी प्रथम द्वितीय तर सिंधुदुर्गचा अविनाश अनुभवणे तृतीय आला. २०० मीटर धावणे हिट १ प्रकारात सिंधुदुर्गचा राहुल काळे प्रथम, रायगडचा शुभम नांदगांवकर द्वितीय, पालघरचा गणेश वाघचौरे तृतीय आला.

२०० मीटर धावणे हिट २ प्रकारात रायगडचा मनोज हंबीर प्रथम, सिंधुदुर्गचा जयेश कदम द्वितीय तर नवी मुंबईचा विनोद भील तृतीय आला. याच प्रकारातील महिलांच्या १५०० मीटर धावणे प्रकारात रायगडच्या माधुरी लोखंडे प्रथम, सिंधुदुर्गच्या निकिता नाईक व रिना अंधेर अनुक्रमे द्वितीय व तृतीय आले. थाळी फेकमध्ये रत्नागिरीच्या धनश्री घाडी प्रथम व तेजस्विनी जाधव तृतीय आल्या. द्वितीय पालघरच्या गोदावरी येनकुरे आल्या.

२०० मीटर हिट १ मध्ये रत्नागिरीच्या मंजिरी रेवाळे, द्वितीय नवी मुंबईच्या सीमा यादव तर तृतीय सिंधुदुर्गच्या अस्मिता कारंडे आल्या. २०० मीटर हिट २ स्पर्धेत रत्नागिरीच्या अमृता वडाम प्रथम, सिंधुदुर्गच्या शितल नांदोसकर द्वितीय तर नवी मुंबईच्या इंदिरा भोईर तृतीय आल्या.सांघिक खेळातील साखळी सामन्यामधील फुटबॉल प्रकारातील पुरुष गटात रत्नागिरी, रायगड, पालघर विजेते ठरले. हॉकीमध्ये रत्नागिरी, नवी मुंबई विजेते ठरले. महिलांच्या गटातील सांघिक खेळ साखळी सामन्यात व्हॉलीबॉलमध्ये ठाणे ग्रामीण, सिंधुदुर्ग, रायगड, बास्केट बॉलमध्ये नवी मुंबई विजयी झाली, तर सिंधुदुर्ग व रायगडला चाल मिळाली.

खो-खोमध्ये रायगड, नवी मुंबई जिंकली असून रत्नागिरीला पुढील चाल मिळाली. कबड्डी स्पर्धेत पालघर, रत्नागिरी जिंकली. तर रायगडला पुढील चाल मिळाली. यशस्वी खेळाडूंचे जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांनी अभिनंदन केले.विजेत्यांचा गौरवखो-खोमध्ये सिंधुदुर्ग, नवी मुंबई, रायगड विजेते झाले. हँडबॉलमध्ये नवी मुंबई, पालघर, सिंधुदुर्ग विजेते ठरले. कबड्डीमध्ये रत्नागिरी, नवी मुंबई विजयी झाली. व्हॉलीबॉलमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग व ठाणे ग्रामीण विजयी झाल्या. बास्केट बॉलमध्ये नवी मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग विजयी झाले. विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. 

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिस