शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

‘हायटेक’सह लोकसंस्कृतीही

By admin | Updated: October 7, 2014 23:53 IST

प्रचार रंगीला रेऽऽ : भजनासह पथनाट्यांना आलाय जोर

विहार तेंडुलकर -रत्नागिरी प्रचारसभांच्या तोफा अजून म्हणाव्या तशा धडधडू लागलेल्या नाहीत. त्यामुळे हायटेक प्रचाराला जोर आला आहे. वॉटस्अप, फेसबुक, टिष्ट्वटरच्या माध्यमातून प्रचार केला जात असताना दुसरीकडे लोकसंस्कृतीही जागवली जात आहे. जिल्ह्यातील दापोली, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी, राजापूर या पाचही मतदारसंघात सध्या घरगुती प्रचाराचा जोर आहे. सध्या वॉटस्अप, फेसबुक ही माध्यमे शहरी भागापासून ते ग्रामीण भागातील तरूणांपर्यंत पोहोचली आहेत. त्यामुळे सध्या अनेक उमेदवारांनी याचाही आधार घेतला आहे. या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रत्येक पक्षाने त्यांच्यातील तरूण कार्यकर्त्यांकडे या हायटेक प्रचाराची जबाबदारी दिली आहे. नवमतदारांबरोबरच तरूण मतदारांकडे यंदा प्रत्येक पक्षाने लक्ष पुरवले आहे. त्यामुळे हा मतदार आपल्याकडे खेचण्यासाठी सध्या विविध पक्षांमध्ये चढाओढ लागली आहे.ग्रामीण भागातील प्रौढ आणि वृध्द मतदारांना आपलेसे करण्यासाठी आता उमेदवारांनी आणखी एक शक्कल लढवली आहे. पथनाट्य, प्रचाररथ, भजनासह वाद्यवृंद अशा जुन्या लोककलांचाही आधार घेतला जात आहे.राजापूर - लांजा - साखरपा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांनी प्रचाररथाव्दारे आपला प्रचार सुरू ठेवला आहे. गुहागर विधानसभेतील राष्ट्रवादीचे उमेदवार भास्कर जाधव यांनी पथनाट्याद्वारे प्रचार सुरू केला आहे. काही उमेदवारांनी लावणी, तमाशाचाही प्रचारासाठी आधार घेतला आहे.रस्त्याच्या कडेला ही कला सादर करण्यात येत असल्याने त्याठिकाणी उत्सुकतेपोटी लोक गर्दी करताना दिसत आहेत. त्यामुळे हा प्रचार मतदारांच्या पचनी पडेल, अशी वेडी आशा उमेदवार बाळगून आहेत.काँग्रेसचा सांस्कृतिक सेललोकसंस्कृतीपर प्रचार करण्यासाठी काँग्रेसने सांस्कृतिक सेल स्थापन केला आहे. या सेलचे कलाकार काँग्रेसच्या प्रत्येक उमेदवाराचा प्रचार करणार आहेत. जनरेटर, स्पीकर फिक्स करून ठेवलेल्या प्रचार रथावर हे कलावंत आपली कला पेश करून प्रचार करणार आहेत. या कलावंतांकडून एका दिवसात किमान दोन कार्यक्रम करून घ्यावेत, असे स्थानिक पक्ष पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.मुंबईची पथकेही कोकणातमुंबईत सांस्कृतिक कार्यक्रम करणाऱ्या पथकांना निवडणुकीमुळे चांगले दिवस आले आहेत. या पथकांनी आता कोकण गाठले असून, विविध पक्षांच्या माध्यमातून या पथकांनी लोककलांचा आधार घेऊन प्रचार चालवला आहे. गुहागर तालुक्यातील गुहागर, शृंगारतळी अशा महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये या पथकाचे कार्यक्रम सुरू आहेत.