शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

सतीश सावंत यांच्यामुळेच पक्षाचा राजीनामा दिला

By admin | Updated: September 17, 2014 22:28 IST

राजन तेली यांचा आरोप

सावंतवाडी : गेली २८ वर्षे प्रामाणिकपणे काम करूनही माझ्यावर अन्याय झाला आहे. सतिश सावंत यांना माझ्यामुळे पक्षात मान मिळत नसल्यामुळेच त्यांनी माझ्याविरोधात कारस्थाने रचली. त्यामुळेच काँगे्रसचा राजीनामा दिला असल्याचा आरोप माजी आमदार राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत केला.यावेळी काका कुडाळकर उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष सतीश सावंत माझ्या विरोधात बोलतात. त्यांच्या विरोधात मलाही बरेच काही बोलता येईल. पण मला ही निवडणूक शांततेत लढवायची आहे, असेही तेली यांनी सांगितले. कोणताही पेशा व्यवस्थित सांभाळू न शकणारी मंडळी काँग्रेसमध्ये पुढे आहेत. जनतेशी त्यांचा कुठलाही संबंध नाही, आणि हे लोक पक्षाच्या हिताचा विचार करीत नसल्याचा टोला तेली यांनी सतीश सावंत यांना लगावला. कणकवली, कुडाळ मतदारसंघात आघाडीचा धर्म पाळून राणेंना मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, सतीश सावंत यांचा आघाडीत बिघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माझ्या विरोधात जे आरोप करीत आहात, ते सर्व आरोप निवडणुकीतून सतीश सावंत यांचे नाव वगळल्याने नैराश्येतून करीत आहेत, असेही तेली यांनी सांगितले. (वार्ताहर)