शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
2
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
3
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
4
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
5
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
6
टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक
7
आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 
8
T20 World Cup भारत जिंकणार नाही; दिग्गजाने जाहीर केले ४ सेमी फायनलिस्ट
9
‘’उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालीय, मनसेची बोचरी टीका 
10
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
11
Breaking: सलमान खानवर गोळीबार प्रकरण; आरोपींपैकी एकाची पोलिस कोठडीत आत्महत्या
12
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी?
13
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी
14
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
15
सिंधुदुर्गात ठाकरे गटाचं बळ वाढणार, राणेंना आव्हान देणारा जुना शिवसैनिक घरवापसी करणार 
16
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
17
Fact Check: नेपाळ संसदेत पंतप्रधान मोदींवर झाली नाही टीका; जाणून घ्या व्हायरल Videoचे 'सत्य'
18
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
19
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
20
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला

परमहंस भालचंद्र महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवास भावपूर्ण वातावरणात प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 3:32 PM

पुढील तीन दिवस हा विधी होणार आहे. तसेच पुण्यतिथी महोत्सवाच्या पहिल्या दिवशी कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातून आणि मुंबई, पुणे अशा विविध भागांतून हजारोंच्या संख्यने भाविक कणकवलीत दाखल झाले आहेत . त्यांनी भालचंद्र महराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.

सुधीर राणे 

कणकवली : योगियांचे योगी परमहंस भालचंद्र महाराज यांच्या ४२ व्या पुण्यतिथी महोत्सवास शुक्रवारपासून येथील आश्रमात भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला. या उत्सवाच्या पहिल्याच दिवशी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. या उत्सवामुळे अवघी कनकनगरी भक्तीरसात न्हाऊन निघाली आहे.भालचंद्र महाराजांचा प्रत्येक उत्सव हा भक्तगणांसाठी चैतन्याची, आनंदाची आणि भक्तीची पर्वणीच असतो. शुक्रवारी पहाटे समाधीपूजन,काकड आरतीपासूनच परमहंस भालचंद्र महाराज संस्थान भक्तांच्या गर्दीने फुलून गेले. बाबांच्या या उत्सवानिमित्त समाधीस्थळ फुलांनी तर परिसरात मंडप,विद्युतरोषणाईनी सजवण्यात आले आहे.सर्व भक्तांच्या कल्याणार्थ भालचंद्र महारूद्र महाअभिषेक अनुष्ठान हा धार्मिक विधी काशिनाथ कसालकर यांनी सपत्नीक केला. यावेळी ब्रम्हवृंद व संस्थांनचे अध्यक्ष सुरेश कामत, व्यवस्थापक विजय केळुसकर, इतर सदस्य व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढील तीन दिवस हा विधी होणार आहे. तसेच पुण्यतिथी महोत्सवाच्या पहिल्या दिवशी कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातून आणि मुंबई, पुणे अशा विविध भागांतून हजारोंच्या संख्यने भाविक कणकवलीत दाखल झाले आहेत . त्यांनी भालचंद्र महराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.

तद्नंतर आरती व दुपारी महाप्रसादाचा लाभ घेतला.दुपारपासून ४ वाजेपर्यंत विविध सुश्राव्य भजने झाली. सायंकाळी ४ वाजल्यानंतर ह.भ.प. कीर्तनचंद्र श्रेयस बडवे ,रा.पुणे यांचे 'नामदेवांना सद्गुगुरू दर्शन ' या विषयावर किर्तन झाले. या किर्तनालाही भक्तगणांनी मोठी गर्दी केली होती.

यापुढील चार दिवस हा सोहळा असाच भावभक्तीची अनुभुती देणारा ठरणार असून या पुण्यतिथी महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन भालचंद्र संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :konkanकोकणsindhudurgसिंधुदुर्ग