पाळणेकोंड धरण ओव्हर फ्लो, नगराध्यक्षांकडून जलपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 04:38 PM2020-07-08T16:38:01+5:302020-07-08T16:39:40+5:30

सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणारे पाळणेकोंड धरण वेळेआधीच तुडुंब भरून वाहू लागल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नगराध्यक्ष संजू परब यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत पाळणेकोंड धरणावर जाऊन मंगळवारी जलपूजन केले.

Palnekonda Dam overflow, Jalpujan by the Mayor | पाळणेकोंड धरण ओव्हर फ्लो, नगराध्यक्षांकडून जलपूजन

सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणारे पाळणेकोंड धरण पूर्ण भरले असून त्याचे जलपूजन नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते झाले. यावेळी अन्नपूर्णा कोरगावकर, सुधीर आडिवरेकर, शुभांगी सुकी, दीपाली भालेकर आदी उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्देपाळणेकोंड धरण ओव्हर फ्लो धरणातून सावंतवाडीला पाणीपुरवठा

सावंतवाडी : सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणारे पाळणेकोंड धरण वेळेआधीच तुडुंब भरून वाहू लागल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नगराध्यक्ष संजू परब यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत पाळणेकोंड धरणावर जाऊन मंगळवारी जलपूजन केले.

तब्बल १८ मीटरची खोली यावर्षी १२ जुलैपूर्वीच भरली आहे. नगराध्यक्ष परब यांनी जलपूजन करून धरणात नारळ अर्पण केला. यावेळी त्यांच्यासमवेत उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, पाणीपुरवठा सभापती नासीर शेख, नगरसेवक मनोज नाईक, राजू बेग, आनंद नेवगी, शुभांगी सुकी, उत्कर्षा सासोलकर, समृद्धी विर्नोडकर, भाजपाचे शहर उपाध्यक्ष अजय गोंदावळे, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.

जीवन प्राधीकरणकडून सावंतवाडी नगरपालिकेच्या ताब्यात आलेले हे धरण सरासरी पहिल्यांदाच १२ जुलैपूर्वी ह्यओव्हर फ्लोह्ण झाले आहे. आतापर्यंत या धरणाला चाळीस वर्षांपेक्षा अधिक काळ होऊन गेला आहे. मात्र, एवढ्या लवकर हे धरण पहिल्यांदाच भरले आहे, असे पाणी पुरवठा अभियंता, पालिकेचे बांधकाम अभियंता तथा पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी भाऊ भिसे यांनी सांगितले.

सावंतवाडी शहराला येथील धरणातून पाणीपुरवठा केला जातो. सावंतवाडीला कायमच पुरेसा पाणीपुरवठा होत असतो. मात्र, आता यावर्षी वेळेआधी धरण भरले आहे. पावसामुळे मंगळवारी सांडवा वाहू लागला. याबाबतची माहिती मिळताच नगराध्यक्ष परब यांनी जाऊन त्याठिकाणी जलपूजन केले. यावेळी पदाधिकारी तसेच अधिकारीही उपस्थित होते.

 

Web Title: Palnekonda Dam overflow, Jalpujan by the Mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.