शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

मालवणमध्ये पर्यटकांची बोट उलटली; एका महिलेचा मृत्यू, मुलगी गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2019 3:40 PM

पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

मालवण: तालुक्यातील देवबाग संगम खाडीपात्रात बोटिंगसाठी पर्यटकांना घेऊन गेलेली बोट वाऱ्यामुळे उलटल्याची दुर्घटना गुरुवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत माया आनंद माने (वय ६०, रा. आंबिवली, कल्याण) या महिला पर्यटकाचा मृत्यू झाला. तर अनया अमित अणसुळे (वय ३, रा. बदलापूर) ही मुलगी गंभीर झाल असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.ठाणे, कल्याण परिसरातील पर्यटकांचा ग्रुप देवबागमध्ये पर्यटनासाठी आला होता. गुरुवारी सकाळी हे पर्यटक बोटीने देवबाग खाडीपात्रात बोटिंग करत असताना देवबाग संगम परिसरात ही बोट उलटली. यावेळी ९ पर्यटक पाण्यात फेकले गेले. यामध्ये ५ महिला, ३ लहान मुले आणि एका पुरुषाचा समावेश होता. बोट समुद्रात उलटल्यानंतर स्थानिक मच्छीमारांनी या सर्वांना पाण्याबाहेर काढून उपचारासाठी मालवणातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र यातील माया माने या महिला पर्यटकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तर अनया अणसुळे या लहान मुलीची प्रकृती गंभीर असल्याने तिला उपचारासाठी अन्यत्र हलवण्यात येणार आहे. या दुर्घटनेमुळे खाडीपात्र आणि सागरी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा  प्रश्न निर्माण झाला आहे.