शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
3
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
4
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
5
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
6
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
7
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
8
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
9
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
10
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
11
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
12
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
13
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
14
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
15
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
16
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
17
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
18
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
19
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
20
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई

Sindhudurg: किनारपट्टीवरील अनधिकृत बांधकामांना तहसीलदारांकडून नोटिसा

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: October 21, 2023 3:34 PM

सात दिवसांत अनधिकृत बांधकाम हटवा, अन्यथा कारवाई

सिंधुदुर्ग : मालवण नगरपालिका हद्दीतील बंदर जेटी ते दांडीपर्यंतच्या किनारपट्टीवरील अनधिकृत बांधकाम काढण्यासाठी मुख्याधिकारी, मंडळ अधिकारी, बंदर निरीक्षक व उपअधीक्षक भूमी अभिलेख यांनी एकत्रित केलेल्या स्थळ पाहणीनुसार एकूण ६८ बांधकामे अनधिकृत असल्याचे आढळून आले आहे. ही बांधकामे स्वखर्चाने हटविण्याबाबत तहसीलदारांकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.ही अनधिकृत बांधकामे सीआरझेड अधिसूचना १९९१ आणि २०११ मधील महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ कलम १८ मधील नियमांचे उल्लंघन करून करण्यात आली आहेत. तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ मधील तरतुदींचा भंग करून करण्यात आली आहेत. या बांधकामांकरिता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमांतर्गत महसूल विभागाची अथवा महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ च्या तरतुदींतर्गत महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ॲथॉरिटीची परवानगी घेण्यात आलेली नाही, असे नोटिसीत नमूद केले आहे.

सात दिवसांत हटवा, अन्यथा कारवाईअनधिकृत बांधकामे संबंधितांनी सात दिवसांच्या आत स्वखर्चाने हटवावीत, असे ३ ऑक्टोबरच्या नोटिसीत म्हटले आहे. दिलेल्या मुदतीत बांधकामे स्वतःहून हटवली न गेल्यास नगरपालिका, बंदर, भूमी अभिलेख, महसूलच्या संयुक्त पथकामार्फत कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी येणारा खर्च संबंधितांकडून थकबाकी म्हणून वसूल करण्यात येणार आहे. दरम्यान, सात दिवसांच्या मुदतीला सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास पुन्हा संबंधितांना महसूलकडून नोटिसा बजावल्या जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMalvan beachमालवण समुद्र किनारा