Night curfew imposed in the district, now a fine of Rs 500 for walking without a mask | जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू, विनामास्क फिरल्यास आता 500 रुपये दंड

जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू, विनामास्क फिरल्यास आता 500 रुपये दंड

ठळक मुद्देजिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू : जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मीविनामास्क फिरल्यास आता 500 रुपये दंड

सिंधुदुर्ग : जिल्‍हयात रात्री 11.00 ते सकाळी 5.00 वाजेपर्यंत कोणीही विनाकारण बाहेर फिरु नये. मात्र यामधून अत्‍यावश्‍यक सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व वैद्यकीय कारणास्‍तव रुग्‍ण व त्‍यासोबत असलेले नातेवाईक यांना सूट देण्यात आली आहे. सदर वेळेत विनाकारण फिरताना आढळल्‍यास अशा व्‍यक्‍तींच्‍या विरोधात नियमानुसार कार्यवाही करण्‍यात येईल.

जिल्ह्यातील सर्व सार्जवनिक ठिकाणी, आस्‍थापना, समारंभ, कार्यक्रमाचे ठिकाणी मास्‍क वापरणे बंधनकारक असेल. मास्‍क, रुमाल न वापरल्‍यास 500 रुपये दंड आकारण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.

तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्‍यक्‍तींकडून 1 हजार रुपये दंडाची रक्‍कम महसूल, पोलीस व स्‍थानिक प्राधिकरण वसूल करतील. मास्‍क जवळ बाळगून त्‍याचा वापर न करणे, किंवा योग्‍य रितीने वापर न करणे या बाबी सुध्‍दा मास्‍कचा वापर न करणे, याप्रमाणे समजण्‍यात येऊन दंड आकारण्यात येईल.

लग्‍न समारंभ फक्त 50 व्‍यक्‍तीच्‍या उपस्थितीत पार पाडता येईल. त्यासाठी संबंधित तहसिलदारांची पूर्वपरवानगी घेणे आवश्‍यक आहे. सांस्‍कृतिक कार्यक्रम, क्रीडास्‍पर्धा, यात्रा, जत्रा, उरुस इत्‍यादीचे फक्त धार्मिक विधी फक्त 50 व्‍यक्‍तींच्‍या मर्यादेत करता येतील. त्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक आहे.

जिल्‍हयातील आठवडी बाजार हे स्‍थानिक प्राधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय भरवता येणार नाहीत. पर्यटन स्‍थळे, आठवडा बाजाराची ठिकाणे, सर्व सार्वजनिक, धार्मिक स्‍थळे, उद्याने, मोकळया जागा, मनोरंजन पार्क, क्रीडांगणे, समुद्र किनारे इत्‍यादी ठिकाणी एकाचवेळी 50 पेक्षा जास्‍त लोकांना एकत्र येण्‍यास मज्‍जाव करण्‍यात आला आहे.

कोव्‍हीड 19 विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी महसूल, पोलीस व संबंधित स्‍थानिक प्राधिकरण यांची पथके तयार करण्यात येणार आहेत. सदर पथके सार्वजनिक ठिकाणी, कार्यक्रमांचे ठिकाणी भेटी देवून कोव्‍हीड -19 बाबत तरतूदींचा भंग होत असल्‍यास दंडात्मक कारवाई करतील. अतिथी, ग्राहकांनी वापरलेली फेस कव्‍हर, मास्‍क, हातमोजे यांची संबंधितांनी योग्‍य प्रकारे विल्‍हेवाट लावावी, असे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.

Web Title: Night curfew imposed in the district, now a fine of Rs 500 for walking without a mask

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.