शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
2
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
3
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
4
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
5
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
6
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
7
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
8
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
9
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
10
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
11
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
12
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
13
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
14
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
15
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
16
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
17
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
18
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
19
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
20
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय पक्ष्याचं दर्शन झालंय दुर्मीळ

By admin | Updated: December 29, 2014 00:00 IST

मोरांची संख्या घटली : अधिवास सोडताना कधी जखमी झाल्यास उपचार हवेत

फुणगूस : मोर म्हटलं की, आपला पिसारा फुलवून थुईथुई नाचणारा मनमोहक पक्षी नजरेसमोर येतो. आभाळात काळे ढग जमा झाले की, कोकणात अनेक ठिकाणी जवळपास सकाळच्या किंवा सायंकाळच्या सत्रात आपला पिसारा फुलवून नाचणारा मोर हमखास दिसतो. परंतु अलिकडच्या काळात हे दृश्य फारच दुर्मीळ होत चालले आहे. आपल्या देशाचा राष्ट्रीय पक्षी म्हणून मोराला गौरविण्यात येते. पण जंगलतोडीसह विविध कारणांमुळे आज मोराचे दर्शन दुर्मीळ होत चालले आहे.पूर्वी कोकणात डोंगराळ भागातून मोठ्या प्रमाणात मोर ‘म्यॉऽव म्यॉऽव’ असा केकारव करीत विहार करताना सर्रास दिसायचे. रस्त्यावर किंवा खेडोपाड्यात मोर फिरताना दिसायचे. परंतु आज मोठ्या प्रमाणात होणाऱ्या मोरांच्या शिकारीमुळेही त्यांचे प्रमाण कमी होत चालले आहे. मोठ्या प्रमाणात होणारी जंगलतोड व मोरांची शिकार यांच्यावरती निबंध आणणे गरजेचे बनले आहे. तरच मोर व जंगल बचाव होईल. नाहीतर मोर हा पक्षी कालबाह्य होईल. पुढच्या पिढीला मोर फक्त इतिहास बनून वा केवळ चित्रात दिसेल, अशी भीती व्यक्त होत आहे.कोकणात अनेक ठिकाणी मोरांची संख्या अधिक असल्याचा दावा केला जात असला तरी मोरांच्या दुर्मीळ झालेल्या दर्शनाने पक्षीमित्र चिंता व्यक्त करीत आहेत. चिपळूण, सिंधुदुर्ग, कोल्हापूरच्या काही भागात मोर पाहायला मिळतात.चिपळूण रावतळे भागात विंध्यवासिनी मंदिराच्या मागे असलेल्या धामणवणे परिसरात मोर मोठ्या प्रमाणावर आहेत. असुर्डे ते शिंदे आंबेरी या परिसरातही पाणवठ्यापासून मोकळ्या असलेल्या शेतजमिनीत मोर पाहायला मिळतात. निवळी, रायगड, पोलादपूरच्या अगोदर काही ठिकाणी घाटात मोर दृष्टोत्पत्तीस पडतात. मात्र, या सर्व परिस्थितीतही कोकणात मोरांसाठी एखादे क्षेत्र आरक्षित केल्यास व त्यांच्या निवासाचे केंद्र उभारल्यास पर्यटकांसाठी ही एक संधी उपलब्ध होऊ शकेल, असा विश्वासही व्यक्त केला जात आहे. (वार्ताहर)जंगलातून रहदारीसाठी केलेले रस्ते व त्यामधून वाहतूक होत आहे. जंगलातील मोर अधिवासासाठी इकडून तिकडे जात असताना काही वेळा जखमी होतात. संबंधित व्यक्तीकडे संपर्क साधण्यासाठी दूरध्वनी सूची नसल्याने त्यांच्यासमोरही अडचण निर्माण होते. वन विभागाने संपर्क सूची प्रसिद्ध करणे गरजेचे आहे. एखाद्या जखमी पक्ष्यावर औषधोपचार करण्यासाठीही दवाखाना नसल्याने फारच गैरसोयीचे होते. यादृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. - अनिकेत बापट, निसर्गमित्र चिपळूण