शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
2
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
3
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
4
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
5
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
6
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
7
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
8
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
9
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
10
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
11
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
12
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
13
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
14
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
15
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
16
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
17
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
18
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
19
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
20
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत शनिवारी संगीत महोत्सव

By admin | Updated: February 26, 2015 00:20 IST

नामवंतांची उपस्थिती : आचरेकर प्रतिष्ठानच्यावतीने आयोजन

कणकवली : येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने शनिवारी (दि.२८) व रविवारी (दि. १ मार्च) १७ वा संगीत महोत्सव प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात सुप्रसिद्ध गायिका देवकी पंडित, पं. मोहन दरेकर, पं. शैलेश भागवत, पं. राजा काळे उपस्थित राहून आपली कला सादर करणार आहेत.महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सहकार्याने संगीत महोत्सवांतर्गत शास्त्रीय संगीत रसग्रहण कार्यशाळा व पं. जितेंद्र अभिषेकी स्मृती संगीत संमेलन आयोजित करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी १० वाजता कणकवलीच्या नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रज्ञा खोत यांच्या हस्ते या संगीत महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी सुप्रसिद्ध गायिका देवकी पंडित, सनई वादक पं. शैलेश भागवत, पं. जितेंद्र अभिषेकी, सघनगान शिक्षण केंद्राचे गुरू पं. समीर दुबळे उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन समारंभानंतर संगीत महोत्सवाचे पहिले सत्र सकाळी १०.३० वाजता सुरू होईल, तर दुसरे सत्र दुपारी ३ वाजता होईल. रविवारी सकाळी १० वाजता तिसरे सत्र होणार आहे. या तीन सत्रांमध्ये देवकी पंडित यांची गायन कार्यशाळा, तसेच पं. शैलेश भागवत यांची सनई व सुंदरी वादनाची कार्यशाळा होईल. शनिवारी सायंकाळी ७ वाजता पं. जितेंद्र अभिषेकी सघनगान शिक्षण केंद्राची विद्यार्थिनी सुहिता केरकर हिचे गायन, त्यानंतर पं. शैलेश भागवत यांचे शहनाई वादन व देवकी पंडित यांचे गायन होणार आहे, तर रविवारी सायंकाळी ७ वाजता पं. जितेंद्र अभिषेकी सघनगान शिक्षण केंद्राची विद्यार्थिनी योगिता रायकर हिचे गायन, त्यानंतर पं. मोहन दरेकर आणि पं. राजा काळे यांचे गायन होईल. त्यांना तबलासाथ दयेश कोसंबे व संवादिनी साथ राया कोरगावकर, उदय कुळकर्णी करणार आहेत. या संगीत महोत्सवाचा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष वामन पंडित, सहकार्यवाह मंदार आळवे यांनी केले आहे. (वार्ताहर)