शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

अडचणी सोडविण्यास एमटीडीसी असमर्थ

By admin | Updated: January 30, 2015 23:11 IST

चर्चासत्र गुंडाळले : परिसंवादात पर्यटन व्यावसायिकांचा आरोप

मालवण : सिंधु महोत्सवाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी निवास न्याहारीधारकांसाठी आयोजिलेल्या पर्यटन विकासाच्या संकल्पना या चर्चासत्रात जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांनी पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना टार्गेट केले. पर्यटन जिल्हा घोषित होऊन १५ वर्षे झाली, तरी येथील पर्यटन व्यावसायिकांच्या अडचणी सोडविण्यास एमटीडीसी असमर्थ ठरली, असा आरोप व्यावसायिकांनी केला.देवगड व वैभववाडी तालुक्यातील पर्यटन व्यवसाय वाढीसाठी कोणते प्रयत्न केले? पर्यटन व्यवसाय करणाऱ्यांना बँका कर्ज देत नाहीत. त्यासाठी एमटीडीसी व्यावसायिकांना सहकार्य करीत नाही. १५ वर्षांत पर्यटन व्यावसायिकांसाठी एमटीडीसीने कोणते धोरण राबविले? अशा प्रश्नांची सरबत्ती केल्याने एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांना चर्चासत्र गुंडाळावे लागले. युएनडीपी, पर्यटन विभाग व जिल्हा परिषदेच्यावतीने येथील बोर्डिंग मैदानात सिंधुदुर्ग महोत्सवाचे आयोजन केले आहे. शुक्रवारी सकाळच्या सत्रात पर्यटन व्यावसायिकांसाठी मार्गदर्शन व चर्चासत्राचे आयोजन केले होते. यावेळी एमटीडीसीच्या अधिकारी किशोरी गद्रे, एमटीडीसीचे रिजनल मॅनेजर जगदीश चव्हाण, महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलचे संचालकीय सदस्य चंद्रकांत सदडेकर, प्रकल्प व्यवस्थापक दीपक माने, सल्लागार किरण सुलाखे, पर्यटन व्यावसायिक भाऊ सामंत, आप्पा लुडबे, गुरू राणे, महेश मांजरेकर, सुधीर जोशी, दिनानाथ बांदेकर, आनंद जामसंडेकर, शैलजा पाटील, आदी पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.भाऊ सामंत म्हणाले, मी गेली १० वर्षे घुमडे येथे इको पर्यटन व्यवसाय सुरू केला आहे. यासाठी आवश्यक भांडवल आपल्याकडे नाही. बँका कर्ज देत नाहीत. शासनाने जर पर्यटन व्यावसायिकांचे हित जपायचे ठरविले असेल तर अशा व्यावसायिकांच्या अडचणी व समस्या जाणून त्यांना सवलती दिल्या पाहिजेत. (प्रतिनिधी)देवगड-वैभववाडी अनौरस : जोशीदेवगड येथील ज्येष्ठ पर्यटन व्यावसायिक सुधीर जोशी यांनी शासनाच्या पर्यटन धोरणाबाबत नाराजी व्यक्त करताना जिल्ह्यातील देवगड व वैभववाडीला अनौरस पुत्राप्रमाणे पाहिले जात असल्याचे सांगितले. देवगडला सुंदर बिचेस, मंदिरे, किल्ले, बॅकवॉटर्स असतानाही त्याची प्रचार व प्रसिद्धी शासनाकडून होत नाही. याठिकाणी पर्यटक यावेत यासाठी एमटीडीसी प्रयत्न करताना दिसत नाही. बॅक वॉटर्स व किनाऱ्यांमुळे वॉटर स्पोर्ट्स व्यवसाय सुरू झाला आहे. मात्र, मेरिटाईम बोर्डाकडे नियमावली नसल्याने वॉटर स्पोर्टसधारकांना परवाने मिळत नाहीत. - आनंद जामसांडेकरएमटीडीसीने निवास न्याहारी योजना सुरू केली. मात्र, वीजबिले व्यावसायिक दराने वसूल केली जातात. शासन अशा व्यावसायिकांवर अन्य कर लादते. - बांदेकर सिंधुदुर्गात चांगली खाद्यसंस्कृती आहे. पर्यटनात वाढ होण्यासाठी सिंधुदुर्गात अनेक संस्कृतींचे योग्यप्रकारे मार्केटींग झाले पाहिजे. व्यवसायात उतरल्यानंतर पर्यटकांना चांगली सेवा देणे आपले कर्तव्य आहे. हे कौशल्य पर्यटन व्यावसायिकांनी आत्मसात केले पाहिजे. - किशोरी गर्दे,व्यवस्थापक , एमटीडीसी