खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव यांची निर्दोष मुक्तता, नेमकं प्रकरण काय...वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 15:57 IST2026-01-03T15:57:08+5:302026-01-03T15:57:46+5:30
याप्रकरणात १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता

खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव यांची निर्दोष मुक्तता, नेमकं प्रकरण काय...वाचा
कुडाळ : उद्धवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सुरू केलेल्या चौकशीच्या निषेधार्थ खासदार अरविंद सावंत व आमदार भास्कर जाधव यांनी शिवसैनिकांसमवेत कुडाळ येथील एसीबी कार्यालयावर मोर्चा काढला होता.
जमावबंदी आदेशाचा भंग करीत आणि रीतसर परवानगी न घेता मोर्चा काढल्याने अरविंद सावंत, भास्कर जाधव यांच्यासह १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, कुडाळ न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात कुडाळ येथील ॲड. सुधीर राऊळ यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव यांच्यासह अरुण दूधवडकर, संदेश पारकर, सतीश सावंत, गौरीशंकर खोत, जान्हवी सावंत, अमित सामंत, इर्शाद शेख, राजन नाईक, संतोष शिरसाट, अभय शिरसाट, अतुल बंगे यांची दिवाणी न्यायाधीश जी. ए. कुलकर्णी यांनी निर्दोष मुक्तता केली आहे.