शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतर प्रश्न ऐरणीवर

By admin | Updated: July 5, 2015 01:17 IST

चिपळूण तालुका : गोवळकोट कदम बौध्दवाडीला दरडीचा धोका

चिपळूण : शहरातील गोविंदगड या ऐतिहासिक किल्ला परिसरात भेगा पडल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भूवैज्ञानिकांकडून या भागाची पाहणी करण्यात आली आहे. गोवळकोट कदम बौध्दवाडी येथील घरांनाही दरडीचा धोका आहे. येथील रहिवाशांचा स्थलांतराचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. याबाबत जलदगतीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. गेल्या महिन्यात गोविंदगड येथील ऐतिहासिक किल्ला परिसरात मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने शासन यंत्रणा जागी झाली आहे. या परिसरातील भेगांमध्ये वाढ होत आहे का? यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नगर परिषद प्रशसानातर्फे कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. तारा बौध्दवाडी, भोईवाडी आदींसह किल्ला परिसरातील तीन वाड्यांना धोका संभवत असल्याने शासनातर्फे १५३ कुटुंबियांना सतर्कतेची सूचना देण्यात आली आहे. धोकादायक स्थितीत ग्रामस्थांना निवारा मिळण्यासाठी समाज मंदिर येथे अडीच लाखांची शेड उभारण्याबाबत नगर परिषद प्रशासनाने नियोजन केले असून याबाबतचे आदेशही संबंधित ठेकेदाराला देण्यात आले आहेत. या परिसरातील कदम बौध्दवाडीला दरडीचा धोका असून याबाबत गेल्या २५ वर्षापूर्वी स्थलांतराबाबत उपाययोजना करण्याचे ठरले होते. मात्र याबाबतचा अहवाल शासनस्तरावर पाठविण्यात आला असून गोविंदगड परिसरात भेगा पडल्या असल्याने स्थलांतराचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. या परिसरातील १५ कुटुंबियांचे स्थलांतर करावे लागणार आहे. स्थलांतराचा प्रश्न अद्याप न सुटल्याने येथील रहिवाशी भीतीच्या छायेखाली जीवन जगत आहेत. या परिसरात सरकारी जागा असून स्थलांतराबाबत कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नसल्याने रहिवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे. येथील रहिवाशांनी प्रांताधिकारी रवींद्र हजारे यांची भेट घेवून चर्चा केली. संरक्षक भिंतीचा प्रस्तावही मंजूर झाला असून यासाठी अंदाजे ३ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याने शासकीय निधीतून ही रक्कम मिळाल्यास संरक्षक भिंतीचा प्रश्नही मार्गी लागेल यासाठी सर्वंकष प्रयत्नांची गरज असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले. (वार्ताहर)