शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
2
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
3
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
4
Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारच्या एका निर्णयाचा कंपन्यांना मोठा फटका; महिन्याला होतंय ₹३०००० कोटींचं नुकसान
5
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
6
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
7
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
8
तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?
9
दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
10
बेशिस्त IPL, बीसीसीआय आणि खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स!
11
वयाची ७४ वर्षे, ७२ देशांची सफर; ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा एकटीनं जगप्रवास!
12
भूसंपादन घोटाळा : अविनाश पाठकसोबतचे आणखी ३ बडे मासे रडारवर! १५ मेपर्यंत पोलिस कोठडीत मुक्काम
13
वर्षभरात १,०९८ कोटींवर चोरट्यांचा डल्ला; राज्यासाठी ‘एनसीआरबी’चा २०२४ चा धक्कादायक अहवाल
14
रेल्वेचा ‘मेगा’ गोंधळ ! सूचना नाही की घोषणा; सलग दुसऱ्या दिवशी कसारा मार्गाचा खोळंबा; प्रवाशांचा आक्रोश
15
..तर विद्रोहाची गाणी नक्कीच रस्त्यावर येतील!
16
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
17
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
18
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
19
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
20
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
Daily Top 2Weekly Top 5

यांत्रिकीकरण योजना बंद

By admin | Updated: November 27, 2014 00:25 IST

राष्ट्रीय फलोत्पादन योजना : शेतकऱ्यांचे २४० प्रस्ताव रखडले

रत्नागिरी : राष्ट्रीय फलोत्पादन योजनेंतर्गत सुरू असलेली यांत्रिकीकरण योजना बंद करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रास कटर, पॉवर स्प्रेअरचे मिळून जिल्हाभरातील सुमारे २४० शेतकऱ्यांचे प्रस्ताव रखडले आहेत.
राष्ट्रीय फलोत्पादन योजनेंतर्गत पंचायत समितीची यांत्रिकीकरण योजना चालू वर्षापासून शासनाने बंद केली आहे. या योजनेंतर्गत ५० ते ७५ टक्के अनुदानाने शेतकऱ्यांना यांत्रिक अवजारे पुरविण्यात येत होती. ही योजना शासनाने बंद केली असली तरी पॉवर टिलर व मोठ्या ट्रॅक्टरकरिता अनुदान सुरू ठेवले आहे. पॉवर टिलरचा वापर जिल्ह्यात नांगरणीकरिता करण्यात येत असला तरी त्याचे प्रमाण अल्प आहे. तर मोठ्या ट्रॅक्टरचा वापर जिल्ह्यात करण्यात येत नाही. एकूणच शासनाच्या निरूत्साही धोरणामुळे जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आले आहेत.
ग्रासकटर व पॉवर स्पेअरसारख्या यांत्रिक अवजारांमुळे शेतकऱ्यांच्या वेळेची बचत व मजूरीचा खर्च वाचत होता. ग्रासकटरमुळे बागेतील गवत कटाई कमी वेळेत पूर्ण होत होती. शिवाय सफाईसाठी मजुरांवर केला जाणारा खर्चदेखील वाचत होता. तसेच पॉवर स्प्रेअरमुळे कीटकनाशक फवारणी योग्यरित्या व वेळेत पूर्ण करणे शक्य होत होते.
ग्रासकटरची किंमत १८००० रूपयांपासून ४५ हजार रूपयांपर्यंत आहे. पॉवर स्पेअरची किंमत ३४ हजारांपासून ५० हजारांपर्यंत आहे. ५० टक्के सबसिडीमुळे शेतकऱ्यांना निम्मी, तर ७५ टक्के सबसिडीमुळे शेतकऱ्यांना २५ टक्के रक्कम मिळत असे. वास्तविक सवलतीच्या दरात मिळणाऱ्या अवजारामुळे शेतकऱ्यांचा फायदा होत होता.
गतवर्षी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातर्फे यांत्रिक अवजारांसाठी २ कोटी ३० लाखाचे थेट अनुदान वितरीत करण्यात आले होते. परंतु अनुदान बंद केल्याने शेतकऱ्यांना आता पूर्ण किमतीने पंप किंवा कटर खरेदी करावा लागणार आहे. यावर्षी ४५० शेतकऱ्यांनी प्रस्ताव पाठविले होते. मात्र, योजना बंद झाल्याने शेतकऱ्यांच्या प्रस्तावावर विरजन पडले आहे. (प्रतिनिधी)