शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

विनामास्क फिरणाऱ्या पर्यटकांकडून सर्वाधिक दंड वसुली मालवणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 19:51 IST

coronavirus, tourist, malvan, muncipaltycarporation कोरोना मुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या मालवण पालिकेकडून शहरात कोरोना खबरदारी नियमांचे काटेकोर पालन सुरू आहे. गेले काही महिने विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. दिवाळी हंगामात पर्यटकांचा ओघ वाढल्याने पालिकेने केलेल्या कारवाईत १० दिवसांत १० हजारांचा दंड वसूल झाला आहे. सर्वाधिक दंड वसुली विनामास्क फिरणाऱ्या पर्यटकांकडून करण्यात आली आहे.

ठळक मुद्देविनामास्क फिरणाऱ्या पर्यटकांकडून सर्वाधिक दंड वसुली मालवणातविनामास्क पर्यटकांना रॉक गार्डनमध्ये प्रवेश नाही

मालवण : कोरोना मुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या मालवण पालिकेकडून शहरात कोरोना खबरदारी नियमांचे काटेकोर पालन सुरू आहे. गेले काही महिने विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. दिवाळी हंगामात पर्यटकांचा ओघ वाढल्याने पालिकेने केलेल्या कारवाईत १० दिवसांत १० हजारांचा दंड वसूल झाला आहे. सर्वाधिक दंड वसुली विनामास्क फिरणाऱ्या पर्यटकांकडून करण्यात आली आहे.पर्यटकांचा ओघ वाढल्याने शहरातील सर्व किनारपट्टी भाग व पर्यटन ठिकाणांवर गर्दी आहे. येणारे पर्यटक विनामास्क फिरत असल्याचे दिसून येत आहेत. पालिकेकडे असलेल्या अपुऱ्या कर्मचारीवर्गाची संख्या लक्षात घेता सर्वच ठिकाणी कर्मचारी नियुक्त करणे शक्य नाही. मात्र भरड नाका, बाजारपेठ, रॉक गार्डन, किनारपट्टी याठिकाणी फिरून पालिका कर्मचारी दंड वसुली करीत आहेत.पर्यटन व्यावसायिक, दुकानदार यांनीही स्वत: मास्कचा वापर करावा. तसेच पर्यटकांना आवाहन करीत मास्कचा सक्तीने वापर करावा अशा सूचना कराव्यात, असे आवाहन पालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.शहरातील हॉटेल व लॉज व्यावसायिकांना पालिका प्रशासनाने सूचनापत्र जारी केले आहे. कोविड खबरदारी नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच मास्क सक्तीबाबत पर्यटकांचे प्रबोधन करावे अशा सूचना पालिका प्रशासनाने हॉटेल व लॉज व्यावसायिक यांना दिल्या आहेत, अशी माहिती नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिली.विनामास्क पर्यटकांना रॉक गार्डनमध्ये प्रवेश नाहीमालवण शहरात येणाऱ्या पर्यटकांचे मुख्य आकर्षण रॉक गार्डन आहे. याठिकाणी पर्यटकांचा ओघ वाढला असून विनामास्क असलेल्या कोणत्याही पर्यटकाला रॉक गार्डन येथे प्रवेश दिला जाणार नाही. यासह दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. नो मास्क, नो एन्ट्री असे धोरण असल्याचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuncipal Corporationनगर पालिकाsindhudurgसिंधुदुर्गtourismपर्यटन